घरताज्या घडामोडीभाजपला जळगावमध्ये हादरा, वर्षावर १० नगसेवकांच्या हाती शिवबंधन

भाजपला जळगावमध्ये हादरा, वर्षावर १० नगसेवकांच्या हाती शिवबंधन

Subscribe

भाजपच्या विद्यमान नगरसेवकांनी पक्षाला सोडचिट्ठी देत रामराम

भाजपला जळगावमध्ये पुन्हा हादरा बसला आहे. जळगाव मुक्ताईनगर नगरपालिकेच्या १० नगरसेवकांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी या १० नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये ७ विद्यमान नगरसेवक आहेत तर ३ माजी नगरसेवक आहेत. यामुळे भाजपला मोठे खिंडार पडले आहे. यापुर्वी महापौर शिवसेनेचा झाल्यामुळे भाजपला धक्का बसला होता तर आता १० नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपलाच हादरा बसला आहे. यापुर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

भाजपच्या विद्यमान नगरसेवकांनी पक्षाला सोडचिट्ठी देत रामराम केले आहे. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात या १० नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हाती शिवबंधन बांधले. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरचे पियुष महाजन, संतोष कोळी,मुकेश वानखेडे आणि इतर ४ नगरसेवकांचा समावेश आहे.

- Advertisement -

जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये १७ नगरसेवक शिवसेनेमध्ये आहेत. बुधवारी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर ४ नगरसेवकांचा पक्षप्रेवश गुरुवारी होणार आहे. शिवसेनेसाठी ही आनंदाची बातमी आहे. राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना मानणारे हे नगरसेवक होते, परंतु त्यांनी राष्ट्रवादीमध्ये न जाता शिवसेनेत प्रवेश केला आहे. जसे आम्ही एकनाथ खडसेंना स्विकारले आहे, असेच महाविकास आघाडीही यांना स्विकारेल असे मंत्री गुलाबराप पाटील यांनी म्हटले आहे.

जळगाव मुक्ताईनगर नगरपालिकेतील १० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे आता मुक्ताईनगर नगरपालिकाही हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भाजपसमोर नगरपालिका राखून ठेवण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. भाजपला जळगावमध्ये बॅकफुटवर आणण्यासाठी राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंना पक्षात घेतले होते. खडसेंच्या नंतर भाजपला एकामागोमाग एक असे धक्के बसताना दिसत आहे. आता शिवसेनेत १० नगसेवक आल्याने भाजपला खिंडार पडले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -