घरमहाराष्ट्रJalna : गावबंदीचे पोस्टर फाडल्याने दोन गटांत तुंबळ हाणामारी; मनोज जरांगेंकडून कारवाईची...

Jalna : गावबंदीचे पोस्टर फाडल्याने दोन गटांत तुंबळ हाणामारी; मनोज जरांगेंकडून कारवाईची मागणी

Subscribe

जालना : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाकडून शांततेत आंदोलन करण्यात येत होते. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला होता. शांततेत सुरू असलेलं आंदोलन चिघळलं. मराठा समाजाकडून राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी घालण्यात आली. तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये जाळपोळीच्या घटनाही घडल्या. सध्या राज्य सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी दोन महिन्यांची मुदत देत आपलं उपोषण मागे घेतलं आहे. परंतु आता जालना जिल्ह्यात गावबंदीचे पोस्टर फाडल्याने दोन गटांत वाद झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मनोज जरांगे यांनी कारवाईची मागणी केली आहे. (Jalna Clash between two groups after tearing down village ban posters Demand for action from Manoj Jarange)

हेही वाचा – सरकारने 80 कोटी लोकांना गुलाम बनवले, संजय राऊत यांचे टीकास्त्र

- Advertisement -

मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत गावागावात राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे पोस्टर लावण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले होते. त्यानुसार, मराठवाड्यासह जालन्यातील भोकर तालुक्यातील बोरगाव जहागीर गावात देखील राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे बॅनर लावण्यात आले होते. मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरी जालना जिल्ह्यात अजूनही गावबंदीचे पोस्टर लावलेले आहेत. मात्र हे पोस्टर गावातील इतर लोकांनी फाडले असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानुसार, सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात हा प्रकार समोर आला.

पोस्टर का फाडले याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गावातील एका गटाच्या पुढार्‍याला जाब विचारला. त्यानंतर  याप्रकरणी दोन गटांत वाद झाला आणि थेट हाणामारीपर्यंत जाऊन थांबला. या हाणामारीत मध्यस्थी करण्यासाठी गेलेले सात मराठा तरुण आणि सरपंच गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – MLA Disqualification : फटाके फुटायला अजून वेळ; आमदार अपात्रतेवर राहुल नार्वेकरांकडून संकेत

गोरगरिबांवरील अन्याय मराठे खपून घेणार नाही

दरम्यान, भोकरदन येथील घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे यांनी देखील कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणाले की, मराठा तरुणांना मारहाण करत असाल तर आम्ही देखील आता शांत बसणार नाही. जालना पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. या प्रकरणी जे कोणी मारहाण करणारे गावगुंड असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. आम्हाला गावगुंडची भाषा शिकवू नयेत. गोरगरिबांवर झालेला अन्याय मराठे खपून घेणार नाही. मारहाण करणाऱ्यांसोबतच त्यांच्या नेत्यांना देखील अटक करा. त्यांना अटक झाली नाही तर आम्ही शांततेच्या मार्गाने राज्यभरात आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन कारवाईचे आदेश देण्याची मागणी देखील त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -