सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या निमित्त अयोध्येत खास सजावट करण्यात आली आहे. दिवाळीचं खास आकर्षक असलेला प्रभू श्री राम नगरीतील दिपोत्सवाने यावर्षी रेकॉर्ड केला आहे. २२ लाख २३ हजार दिव्यांनी अयोध्या नगरी उजळली आहे.
योगी आदित्यनाथ यांना गिनीज वर्ल्ड रोकॉर्ड टीमने प्रमाणपत्र दिले आहेत. शेकडो स्वयंसेवकांनी परिश्रम घेऊन हे २४ लाख दिवे लावले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. हा दीपोत्सव उत्सव यशस्वी करणाऱ्या तब्बल २५ हजार स्वयंसेवकांचे त्यांनी आभार मानले तसेच कौतुक केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन पटेल, यूपीचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांच्यासह अनेक नेत्यांनी या उत्सवाला हजेरी लावली होती
यावेळी अयोध्येच्या भूमीमध्ये रथयात्रेचेही आयोजन करण्यात आले होते. रामायणातील प्रसंग देखील नाट्यरुपांतरित करण्यात आला.
दिव्यांचा लख्ख प्रकाश अयोध्यानगरीत पाहायला मिळाला. या ‘दीपोत्सव’ कार्यक्रमाची सुरुवात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या काळात २०१७ पासून झाली.
या उत्सवात सहभागी होण्यासाठी इतर राज्यातून आणि शहरातील लोक आले होते. त्याच प्रमाणे जगातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये या दीपोत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.