घरमहाराष्ट्रJarange VS Baraskar : बारसकरांच्या आरोपांवर जरांगे म्हणतात, 'सरकारने माझ्याविरुद्ध सापळा रचला'

Jarange VS Baraskar : बारसकरांच्या आरोपांवर जरांगे म्हणतात, ‘सरकारने माझ्याविरुद्ध सापळा रचला’

Subscribe

जालना : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारण आरक्षणाच्या मागणी भोवती फिरत आहे. याच दरम्यान मंगळवारी (20 फेब्रुवारी) राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले. या निर्णयाला काही तास उलटत असतानाच आज मनोज जरांगेंनी दिलेलं आरक्षण नाकारत पुढील आंदोलनाची घोषणा केली आहे. यानंतर आता अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी अनेकांचे संसार उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपावर आता मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर आरोप केले आहेत. मला बदनाम करण्यासाठी सरकारने सापळा रचला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Jarange VS Baraskar On Ajay Baraskars allegations, Manoj Jarange Patil says Government has set a trap against me)

हेही वाचा – Politics : युगेंद्र असो वा जोगेंद्र, निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल; मिटकरींचा दावा

- Advertisement -

अजय बारसरकर यांच्या आरोपावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, गेल्या 6 महिने मी चांगला होतो. याचं उदाहरण मराठा समाजाने घ्यावा. यांना काही मिळालं नाही, यांना सापळा रचून मला बदनाम करायचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रवक्ता आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. तसेच मला चिल्लर लोकांवरती बोलायचं नाही, असे म्हणत अजय बारसकर हे कसले महाराज. मी आतापर्यंत मराठ्यांच्या बाजूने बोललो, त्यामुळे मला आता मराठा समाजाचं नुकसान करणारा माणूस नको आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जर मी तुकाराम महाराजांबद्दल काही बोललो असेल त्यांच्या चरणी लीन होऊन माफी मागेल. आयुष्यातली पहिली माफी मागेल. मी त्यांना इतका मानतो. वारकरी संप्रदायाला मानणारा आहे मी, विद्रोही नाही आहे. तुकाराम महाराजांबद्दल जर काही बोललो असेल तर मी माझे शब्द मागे घेतो, असे म्हणत ज्याला साधं मोबाइलचं फेसबुक विचारत नाही, त्याला लाइव्ह माध्यमांच्या ऑफीसने कसं विचारलं? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. त्यामुळे त्याला काय आरोप करायचे ते करू द्या, कारण तो सापळा आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : अजित पवार गटाला धक्का; सुनील तटकरेंचे मोठे बंधू शरद पवार गटात

आरक्षण आंदोलन संपवण्यासाठी सरकारकडून सापळा

मराठा आरक्षण आंदोलन संपवण्यासाठी हा सापळा असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. याआधी एक सापळा झाला, आता दुसरा सापळा रचला असून प्रत्येकवेळी कोणीतरी घुसवण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारचा सापळा बंद करावा. अजून 16 ते 17 सापळे रचून सरकार यांना (अजय बारसकर) मायाजाळ्यात अडकवत आहे, आमिष दाखवून भुलवत आहे. या दोन चार जणांना आंदोलनात काही मिळवायच होतं, ते मिळालं नसेल. एक जण मुख्यमंत्र्यांच्या पीएसोबत आला होता. आतापर्यंत त्यांना मी 6 महिने गोड होतो. त्यांना सापळा करायचा होता, त्यात एकनाथ शिंदे आणि त्यांचा एक माणूस होता. एकनाथ शिंदे यांचा प्रवक्ता देखील आहे. मला बदनाम करण्याचा सरकारचा सापळा आहे, असा गंभीर आरोपही मनोज जरांगे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -