घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : अजित पवार गटाला धक्का; सुनील तटकरेंचे मोठे बंधू शरद...

Maharashtra Politics : अजित पवार गटाला धक्का; सुनील तटकरेंचे मोठे बंधू शरद पवार गटात

Subscribe

मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष आणि चिन्ह मागितलं आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ पक्ष अजित पवार गट असल्याचा निर्णय देत त्यांना ते दिलं. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पण हा निर्णय येण्याआधीच शरद पवार गटाने अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या सुनील तटकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरे यांना शरद पवार गटात प्रवेश केला आहे. (Maharashtra Politics Shock to Ajit Pawar group Sunil Tatkares elder brother in Sharad Pawar group Anil Tatkare)

हेही वाचा – Amravati : इथे जलसंधारणच्या अधिकाऱ्यांनीच पुरवली विद्यार्थ्यांना उत्तरे; भरती परीक्षांमध्ये पुन्हा गैरप्रकार

- Advertisement -

खासदार सुनील तटकरे यांना शरद पवार यांनी मानाची पद दिली, मंत्रीही केले. त्यांना खासदार करून दिल्लीला पाठवलं. हे सगळे केल्यानंतरही अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सुनील तटकरे हे त्यांच्यासोबत गेले. एवढंच नाही तर ते आता वारंवार शरद पवार गटावर आरोप करताना दिसत आहेत. या सर्व गोष्टींचा वचपा काढण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सुनील तटकरे यांच्याविरोधात खेळी खेळली आहे. सुनील तटकरे आणि त्यांचे मोठे बंधू अनिल तटकरे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. याच गोष्टीचा फायदा शरद पवार यांनी अनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : युगेंद्र असो वा जोगेंद्र, निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल; मिटकरींचा दावा

अनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात प्रवेश केला आहे. अनिल तटकरे यांची पक्षाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल तटकरे यांच्या प्रवेशावेळी माजी मंत्री, आमदार राजेश टोपे, आमदार सुनील भुसारा, विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे व शेकापचे आमदार जयंत पाटील हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, अनिल तटकरे हे यापूर्वी विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -