घरमहाराष्ट्रनवाब मलिकांच्या आरोपांवर जास्मिन वानखेडेंचा इशारा

नवाब मलिकांच्या आरोपांवर जास्मिन वानखेडेंचा इशारा

Subscribe

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. वानखेडेंच्या परिवारातील सदस्यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केल्याचा आरोप केला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलिया कनेक्शन काढू का? असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

कोरोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी एनसीबीचे मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते. वानखेडेंच्या परिवारातील सदस्यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली, असा गंभीर आरोप केला. लदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते याचे पुरावे देखील नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. यावरून जास्मिन वानखेडे यांनी ऑस्ट्रेलिया कनेक्शन काढण्याचा नवाब मलिक यांना इशारा दिला आहे.

- Advertisement -

जास्मिन यांनी पुढे बोलताना ऑस्ट्रेलिया कनेक्शनवर आता जास्त बोलणार नाही. वेळ आली की नक्की बोलेन, असं त्या म्हणाल्या. तसंच ऑस्ट्रेलियाबद्दल नवाब मलिक यांना विचारा ते सांगतील, असंही यास्मिन म्हणाल्या.

नवाब मलिकांचा गंभीर आरोप

नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या परिवारातील सदस्यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली, असा आरोप केला आहे. मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर अपेक्षित आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘वानखेडेंच्या परिवारातील सदस्यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली’


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -