घरमहाराष्ट्रनागपूरअजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर जयंत पाटलांचे उत्तर, म्हणाले...

अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर जयंत पाटलांचे उत्तर, म्हणाले…

Subscribe

राज्याच्या राजकारणात पुन्हा विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या वर्तुळात सुरू असलेल्या अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी या चर्चांवर आपले मत व्यक्त केले.

नागपूर : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूंकप होणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पदावरून पायउतार होणार असून अजित पवार हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबतचे एक ट्वीट अजित पवार यांच्या गटातील समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी केले होते. मिटकरी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये अजित पवार यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख केला आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या वर्तुळात सुरू असलेल्या या चर्चेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी या चर्चांवर आपले मत व्यक्त केले. (Jayant Patil answer to the question of Ajit Pawar becoming Chief Minister)

हेही वाचा – नागपुरच्या इतिहासात ऑनलाईन फसवणुकीची सर्वात मोठी घटना; आरोपीकडे सापडले कोटींचे घबाड

- Advertisement -

नागपूर येथून जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अमोल मिटकरी यांनी केलेले ट्वीट हे त्यांचे मत आहे. एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. अजित पवार मुख्यमंत्री हे कोणत्या गणितात कसे होऊ शकतात, ते कळल्याशिवाय बोलणं योग्य होणार नाही. तर राज्यात नवीन समीकरण पहायला मिळेल का? असा प्रश्न देखील पत्रकारांकडून विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत जयंत पाटील यांनी सांगितले की, मला वाटत नाही भूकंप होईल.

राज्यातील तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा अजित पवार यांच्या हातात गेल्या आहेत. त्यांनी देखील त्यांना मिळालेल्या अर्थखात्याचा पदभार सांभाळत निधी वाटपाला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना 25 कोटी पेक्षा जास्त निधी दिलाय. शिंदे गटाला सुद्धा खुश करण्याचा प्रयत्न झाला आहे, असा प्रश्न जयंत पाटील यांना पोलिसांनी केला. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून काही वर्ष काम केल आहे. मला कौतुक आहे. पुरवणी मागण्या 46 हजार कोटी पर्यंत गेल्या आहेत. सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करु शकते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी मिळतोय, याचा आनंद आहे. मतदारसंघासाठी निधी मिळत असेल, तर चांगली बाब आहे.

- Advertisement -

तसेच, यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवर सुद्धा सुचक वक्त वक्तव्य केले आहे. ज्यांचा पक्ष मोठा आहे, त्यांनी विधानसभा अध्यक्षांना कळवले पाहिजे. काँग्रेस पक्षातून लवकरच आज किंवा उद्या कळवले जाईल. या आठवड्यात निवड होऊ शकते, असे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेता हा विधानसभेचाच होणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली. पावसाळी अधिवेशन सुरू होऊन एक आठवडा झाला आहे, तरी देखील काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता निवडला गेलेला नाही. ज्यामुळे महाविकास आघाडीमधील विरोधी पक्षनेता कोण? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -