घरताज्या घडामोडी..ते झोपतही राष्ट्रवादीच नाव घेतात, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचा पलटवार

..ते झोपतही राष्ट्रवादीच नाव घेतात, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचा पलटवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस हा भरवशाचा पक्ष नाही अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील झोपेतही राष्ट्रवादीचे नाव घेतात असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भरवशाचा पक्ष नाही तर काँग्रेसचे व्यक्तिमत्व वेल कल्चर आहे. ते दरोडेखोर नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता यावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना चांगलाच टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भरवशाचा पक्ष नाही असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं असल्याचा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी उत्तरात, चंद्रकांत पाटील हे झोपेतही राष्ट्रवादीचे नाव घेतात त्यांचे बोलणे मनावर का घेता असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस भरवशाचा पक्ष नाही – चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघात केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक राजकारण, दुपारी एक राजकारण आणि संध्याकाळी एक राजकारण, काँग्रेस एकवेळेस परवडली. काँग्रेसमधील सगळी व्यक्तिमत्व ही वेल कल्चर असतात ती दरोडेखोर नसतात त्यामुळे राष्ट्रवादीनं सलगी करणं याला भाजप भुलणार नाही. राष्ट्रवादीच्या सलगी करणं या डावाला भाजप भुलणार नाही” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


हेही वाचा : राष्ट्रवादी पक्ष भरवशाचा पक्ष नाही, काँग्रेस नेते मात्र वेल कल्चर, चंद्रकांत पाटलांचा टोला

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -