घरमहाराष्ट्रJEE Main Topper: शेतकऱ्याचा मुलगा JEE मेन्समध्ये देशात पहिला; असा होता स्टडी...

JEE Main Topper: शेतकऱ्याचा मुलगा JEE मेन्समध्ये देशात पहिला; असा होता स्टडी पॅटर्न

Subscribe

नीलकृष्णने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचं अभिनंदन केलं आहे.

वाशिम: वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून त्याने कसून अभ्यास केला. आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रीत करत, त्याने JEE मेन्समध्ये देशात पहिला येण्याचा बहुमान पटकावला. वाशीम जिल्ह्यातील बेलखेड येथील शेतकरी निर्मलकुमार गजरे यांचा मुलगा नीलकृष्ण गजरे याने ही कामगिरी केली आहे. 100 टक्के पर्सेंटाईल मिळवून तो देशात पहिला आला आहे. (JEE Main Topper Farmer s son Nilkrushana Gajare tops country in JEE Mains)

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या जेईईमेन्सपरिक्षेचा निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यात नीलकृष्ण गरजे याने तीनशेपैकी तीनशे गुणे मिळवले. देशातून पहिले स्थान पटकावले.

- Advertisement -

फडणवीसांकडून कौतुक

नीलकृष्णने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचं अभिनंदन केलं आहे. नीलकृष्णने सांगितलं की, माझं प्राथमिक शिक्षण कारंजा येथे झालं असून माझे वडील शेतकरी आहेत. वाशिम जिल्ह्यात बेलखेड नावाचं माझं लहानसं गाव आहे. सकाळी 5 तास माझे क्लासेस होते. त्यानंतर 5 ते 6 तास मी दररोज अभ्यास करायचो. मी जो गोल सेट केला होता, त्यानुसार मी सातत्याने अभ्यास करत राहिलो आणि मला यश मिळालं.

असा होता स्टडी पाटर्न

नीलकृष्ण म्हणाला, मी दररोज सकाळी 5 वाजता अभ्यासाला सुरुवात करायचो. रात्री 8:30 पर्यंत खासगी शिकवणी आणि उजळणी असे दैनंदिन वेळापत्रक असायचे. अभ्यासासाठी जागरण करण्याऐवजी 10 वाजता झोपी जायचो. अभ्यासासाठी व्हॉट्सअॅपचा उपयोग वगळता स्वत:ला सोशल मीडियापासून पूर्णत: लांब ठेवले होते. भविष्यात एक चांगला अभियंता होण्यासोबतच भौतिकशास्त्रात संशोधन करायचे आहे. आता संपूर्ण लक्ष्य जेईई अॅडव्हान्स परीक्षेवर आहे. आयआयटी मुंबईच्या सीएस शाखेतून बीटेक करायचे स्वप्न आहे, असं नीलकृष्णने सांगितलं. नीलकृष्ण उत्तम तिरंदाजही आहे. त्याने अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.

- Advertisement -

नीलकृष्णचे वडिल काय म्हणाले?

नीलकृष्णचे वडिल निर्मलकुमार गजरे म्हणाले की, माझे शिक्षङण बारावीपर्यंतच झाले. नाइलाजाने शेतीकडे वळलो. चांगले शिक्षण घेऊन शिक्षक होण्याची इच्छा होती. पण, परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. गावाकडच्या शेतात सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन घेतो. मात्र, दरवर्षी येणाऱ्या संकाटांमुळे आर्थिक गणित जुळत नाहीत. मुलगा हुशार असल्याने त्याच्या शिक्षणावर खर्च करण्याचं ठरवलं. मुख्य म्हणजे त्याला खासगी शिकवणी वर्गाची 75 टक्के शिष्यवृत्ती मिळाल्याने आर्थिक भार कमी झाला. आज त्याने मिळवलेले यथ पाहून आमची उणीव भरून काढल्याचा आनंद आहे, अशी भावना नीलकृष्णचे वडील निर्मलकुमार यांनी नागपुरात बोलताना व्यक्त केली. यावेळी नीलकृष्णची आई योगिता यादेखील उपस्थित होत्या.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : अजित पवारांना आणखी एक क्लीन चिट, आचारसंहिता भंग प्रकरणी दिलासा)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -