घरठाणेJitendra Awhad : शरद पवारांना घरातून हाकलायचं होतं...; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर...

Jitendra Awhad : शरद पवारांना घरातून हाकलायचं होतं…; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर आरोप

Subscribe

 

ठाणेः शरद पवार यांना घरातून हाकलूनच द्यायचं होतं. त्यासाठीच हा सर्व खटाटोप सुरु होता, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केला. ज्या आईने खायला वाढलं त्या आईच्या हातातूनच भांड घ्यायच हा कुठल्या न्याय आहे, अशी खंतही आव्हाड यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

शरद पवार यांनी आता निवृत्ती घ्यावी, असे वक्तव्य अजित पवार यांनी बुधवारी केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी हा आरोप केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार यांनी कधीच कोणाची महत्वकांक्षा रोखली नाही. त्यांनी सर्वांनाच समान संधी दिली. आज त्यांनाच तुम्ही म्हणता की घरी जा. शरद पवार हे सत्तेत कमी राहिले. त्यांनी तुम्हाला सत्ता मिळवून दिली. सत्ता उपभोगायला दिली. त्यांनी निवृत्त व्हावं,असा सल्ला तुम्ही देता. हे सर्व अमानवी आहे.

हेही वाचाःJitendra Awhad : निवडणूक आयोग कटात सहभागी; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

- Advertisement -

धमकावून आमदारांना घेऊन गेले

आमदार निवास येथून धमकावून आमदारांना घेऊन गेले आहेत. मलाही बोलले होते आमच्यासोबत चल. मी त्यांना हो म्हणालो. नंतर शरद पवार यांनी मला विचारलं, काय रे तू पण जाणार आहेस. मी सांगितलं साहेब त्यांना कोण नाही म्हणणार. हो म्हटलं आणि माघारी फिरलो. तेव्हा शरद पवार म्हणाले. हो बरोबर आहे. त्याला कोण नाही म्हणणार नाही. जी तरुण मुले माध्यमांमध्ये शरद पवार यांच्या विषयी चांगलं लिहते. त्यांना धमकी येत आहे. ती सर्व मुले मेसेज करुन मला सांगत आहेत. जे पैशाने विकले गेले नाहीत. त्यांना तुम्ही कसे विकत घेणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

ठाण्याच्या पठ्ठ्यामुळं पक्षाचं वाटोळं, अजित पवारांचा आव्हाडांवर हल्लाबोल

काही आमदारांची ससेहोलपाट होत आहे. इकडे आड-तिकडे विहीर, असं झालंय. पण काही असे लोकं बरोबर घेतले की, त्या संघटनेचं वाटोळं करतील. उदाहरण द्यायचं झालं तर तो ठाण्याचा पठ्ठ्या. ठाण्याच्या पठ्ठ्यामुळे गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले. त्यानंतर संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखरे हे सर्व नेते पक्ष सोडून गेले. वसंत डावखरेंनी मला सांगितलं की, साहेब याला का म्हणून मोठं करतात, असं म्हणत अजित पवारांनी आव्हाडांवर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -