घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: क्रांती रेडकरनं सांभाळून बोलावं इतिहास काढला तर लक्षात येईल,...

Cruise Drugs Case: क्रांती रेडकरनं सांभाळून बोलावं इतिहास काढला तर लक्षात येईल, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Subscribe

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरनं वानखेडेंवर करण्यात आलेल्या आरोपांचे प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिकांच्या आरोपांवर क्रांती रेडकरने पलटवार करत सत्ता आणि पैशाचा गैरवापर करण्यात येत असल्याची टीका केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं असून सांभाळून बोलण्याचा सल्ला क्रांती रेडकरला दिला आहे. तसेच हमाम मे सब नंगे असे सूचक वक्तव्यही आव्हाड यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समीर वानखेडे २५ कोटी खंडणी आणि बोगस जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक सत्ता आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप क्रांती रेडकरने केला आहे. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, क्रांती रेडकरनं थोडं सांभाळून बोलावे जर मागचा इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम मे तो सब नंगे असे सूचक वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

- Advertisement -

सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन

एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर हजारो लोकांपैकी फक्त मोजक्या ६ जणांना पकडले. हे काही कळलं नाही. यामुळे ओळखलं कोन आहे? असे ट्विट केलं आणि ते डिलीट केलं कारण ज्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचे होते ते पोहोचले. नवाब मलिकांनी दाखवलेले जातप्रमाणपत्र खोटं असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केलं आहे. यामुळे भाजपची भूमिका देखील स्पष्ट झाली आहे. मुनगंटीवार यांनी मान्य केलं असल्यामुळे त्यांचे आभार असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

नवाब मलिकांचा आरोप

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावर स्वतःचा दाखला तयार केला आहे. समीर वानखेडेंच्या वडिलांनी जात प्रमाणपत्र दाखवले आहे त्यामुळे वानखेडेंनीही आपले जातप्रमाणपत्र दाखवावे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. वडिलांच्या दाखल्याचा वापर करत स्वतःचा दाखला केला आणि सरकारी नोकरी मिळवली असा नवाब मलिकांचा आरोप आहे. तसेच बोगस जातीच्या दाखल्याचा वापर करुन वानखेडेंनी एका पात्र विद्यार्थ्याची नोकरी हिसकावून घेतली आहे. यामुळे त्यांना शिक्षा झाली पाहिजे असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : समीर वानखेडेंनी केली दोन लग्ने, धर्मही बदलला? नवाब मलिकांच्या आरोपांवर क्रांती रेडकरने दिले उत्तर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -