घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : चौकशीखालील नेत्यांना रिंगमास्टर मोदी नाचवणार; आंबेडकरांची जहरी टीका

Maharashtra Politics : चौकशीखालील नेत्यांना रिंगमास्टर मोदी नाचवणार; आंबेडकरांची जहरी टीका

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते कोणत्या पक्षात जाणार अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी अशोक चव्हाण यांच्यासोबत 10 ते 12 आमदारांचा गटही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत काँग्रेसमध्ये मोठी फूट पडताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत, ते चौकशीखालील नेत्यांना नाचवतील. (Maharashtra Politics Ringmaster Modi will make leaders under investigation dance Prakash Ambedkar venomous criticism)

हेही वाचा – Maharashtra Politics : काँग्रसेमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झालेत; ठाकरेंची टीका

- Advertisement -

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आले की, मोठे नेते भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसेल. यावर ते म्हणाले की, अजिबात नाही. याचं कारण असं आहे की, कुठलीही एखादी व्यक्ती गेली तर त्या पक्षाला फक्त त्रास होतो. अनेक वेळा आमच्याकडचे मंत्री, आमदार गेले, पण पक्ष म्हणून आमच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांचे मित्र किंवा त्यांच्या जवळचे पक्ष सोडून जात होते. पण पक्ष हा कायम राहतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एखाद्याचं जाण्याने फक्त धक्का बसतो, पण त्यामुळे पक्षाला फार परिणाम होतो, असं मी त्याठिकाणी मानत नाही. पण नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे नेते चौकशी खाली आहेत, त्यांना ते नाचवणार आहेत. उच्च नेते किंवा त्याखालील नेते यांनाही ते नाचवणार असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics : ‘ऑपरेशन लोटस’च्या कार्यपद्धतीवर जनता नाराज; थोरात स्पष्टच बोलले

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर

प्रबळ विरोधी पक्ष समोर राहू नये, असा भाजपाचा हेतू आहे का? या सर्व गोष्टींचा परिणाम थेट निवडणुकांवर होईल का? या प्रश्नांवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मला असं वाटत नाही, या सर्व गोष्टीचा परिणाम मतांवर होईल. कारण 75 टक्के लोकांनी आपलं मत तयार केलं आहे. कोणाला द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही. हे मला एकंदरीत दिसतं आहे. पण मी यापूर्वी देखील अनेकदा म्हणालो आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर आहेत. ईडीच्या चौकशीवर ज्यांना हवे त्याने नाचवतील. मग ते काँग्रेस पक्षातील वरिष्ठ असतील किंवा तळागाळातील असतील. त्यांना ते नाचवल्या शिवाय राहणार नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -