घरमहाराष्ट्रराफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवणे ही अंधश्रद्धा नाही - केंद्रीय अर्थमंत्री

राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवणे ही अंधश्रद्धा नाही – केंद्रीय अर्थमंत्री

Subscribe

राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवणे ही अंधश्रद्धा नाही, तो परंपरा आणि श्रध्देचा भाग आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी येथे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात सीतारामन आल्या आहेत. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जीएसटी, वाहन उद्योग, मंदीची स्थिती, बँकांची आर्थिक स्थिती अशा विविध मुद्यांवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. याच वेळी पत्रकारांनी राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्याच्या विषयावर प्रश्न विचारले असता सितारामन आक्रमक झाल्या.

“विजयादशमीच्या दिवशी आपल्याकडे शस्त्रास्त्र पूजन करण्याची परंपरा आहे. मीसुद्धा शस्त्र पूजा करते, सरस्वती पुजन करते. स्वरस्वती पूजेच्या दिवशी वह्या-पुस्तके पेन यांची मी पूजा करते. ही अंधश्रद्धा नाही ही श्रद्धा परंपरा आहे. यापूर्वी देखील एका युद्धनौकेच्या जलावतरण प्रसंगी धार्मिक विधी केले गेले होते. त्यावेळी कोणीच टीका केली नाही, राफेल चाकाखाली लिंबू ठेवल्यामुळे का टीका केली जाते, असेही त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्याच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली होती. याकडे लक्ष वेधले असता सीतारमण यांनी जुजबी उत्तर देत विषय बदलला. परंपरा जपताना विज्ञान-तंत्रज्ञान याची जोड आम्ही सोडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागासाठी केंद्र सरकारकडून अद्याप मदत मिळाली नसल्याच्या विषयावर त्या म्हणाल्या, “नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर निधी देण्यासंदर्भात एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेनुसार काम केले जाते. केंद्रीय मंत्र्यांची एक समिती राज्यात येऊन पाहणी करेल. या पाहणीचा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे दिला जाईल, ही समिती नुकसानी संदर्भात मूल्यांकन करेल. त्यानंतर संबंधित राज्यांना निधी दिला जाईल. महाराष्ट्र सरकारला अंतरिम मदत ही दिली गेली आहे. यामुळे केंद्र सरकारने मदत दिली नाही, असा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. पूरग्रस्त भागासाठी असलेला निधी हा कोणीही रोखू शकणार नाही तो मिळणारच आहे.”

हेही वाचा –

मला जे योग्य वाटलं ते मी केलं – राजनाथ सिंह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -