घरदेश-विदेशसेल्फीवरुन शोधला पत्ता आणि केला विनयभंग

सेल्फीवरुन शोधला पत्ता आणि केला विनयभंग

Subscribe

विकृती कोणत्या थरावर जाईल, याचा नेम नाही. जपानमध्ये एका विकृत चाहत्याने पॉप सिंगरचा विनयभंग केला आहे. विशेष म्हणजे सिंगरच्या सेल्फीवरुन त्याने तिच्या घराचा पत्ता शोधला आणि तिच्या घरी जाऊन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना जपानमध्ये घडली आहे. जपानची पॉप आयडल सिंगर इना मत्सुकोचा एका चाहत्याकडून विनयभंग करण्यात आला आहे. इना ही जपानच्या जे-पॉप गृपची मेंबर आहे. ती २६ वर्षांची आहे. इनाचा विनयभंग करणाऱ्या चाहत्याचे नाव हिबिकी सातो असे आहे. त्याच्या कृत्यामुळे इनाला चेहऱ्यावर इजा झाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

इना मत्सुकोने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा फोटो शेअर केला होता. हा फोटो तिने तिच्या घराबाहेर शेअर केला होता. सातो नावाचे एका चाहत्याने त्या फोटोच्या आधारावर गुगल मॅपमार्फत तिचे घर शोधले आणि तिच्या घरी जावून तिचा विनयभंग केला. विशेष म्हणजे त्याने यामध्ये तिच्या डोळ्यांमध्ये घराचे फोटो तिला दिसले. त्यावरुन त्याने तिचा पत्ता शोधला. याप्रकरणी सातोला पोलिसांनी अटक केली होती. त्याची चौकशी केल्यावर तो इनाचा प्रचंड मोठा फॅन असल्याचा दावा करत होता. त्यानंतर आपण इनाजवळ कसे पोहोचलो, याबाबत सविस्तर माहिती त्याने पोलिसांना दिली.

- Advertisement -


हेही वाचा – पोलीस निरीक्षकाकडून रशियन महिलेवर वारंवार बलात्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -