घरमहाराष्ट्रभाजपा नेते किरीट सोमय्या बोगस FIR विरोधात तक्रार करणार

भाजपा नेते किरीट सोमय्या बोगस FIR विरोधात तक्रार करणार

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या खोट्या एफआयआरप्रकरणी तक्रार दाखल करणार आहेत. खार पोलीस स्टेशनमध्ये किरीट सोमय्या वांद्रे पोलीस निरीक्षकांविरुद्ध तक्रार दाखल करणार आहेत. किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या खोट्या एफआयआरप्रकरणी तक्रार दाखल करणार आहेत. खार पोलीस स्टेशनमध्ये किरीट सोमय्या वांद्रे पोलीस निरीक्षकांविरुद्ध तक्रार दाखल करणार आहेत. किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. तसंच, ‘आज दुपारी 12 वाजता खार पोलिस स्टेशनमध्ये मी वांद्रे पोलिस निरीक्षकां विरुद्ध माझ्या नावावर खोटी एफआयआर नोंदवला बदल तक्रार करणार’, असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

गाडीवरील हल्ल्यासंदर्भात बोगस एफआयआर नोंदवला असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे. ‘मी वांद्रे पोलीस स्टेशनला प्रोटेस्ट लेटर दिलंय की, तुम्ही माझी एफआयआर घेत नाही’ असं त्यांनी म्हटलं. तसंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला.

- Advertisement -

“या अनिल परब आणि उद्धव ठाकरेंना काय वाटतं, की त्यांचा माफिया राज ड्रग माफिया सारखा चालेल का? त्यांच्या माफिया राजमध्ये हनुमान आग लावणारच”, असं म्हटलं. शिवाय त्यांनी पोलीस कमिशनरमध्ये हिंमत नसल्याचं म्हटलं. “काल पोलीसांना एफआयआर फ्लॉट केली ती कोणाला दाखवताहेत. कुठेय किरीट सोमय्याची सही?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसंच, “त्यामध्ये लिहीलंय की, शंभर मीटर लांब आहे. हे किरीट सोमय्यानी कधी सांगितलं. एकच दगड आला. अबी तो पकडेगा ये ठाकरे सरकार.”

पुन्हा एफआयआर नोंदवला जाणार का असं विचारलं असता, यावर सोमय्यांनी “आता एफआयआर नाही. डिसीपी आणि वांद्रे पोलीस इंस्पेक्टर यांच्या विरोधात चिटींग फ्रॉडचा गुन्हा दाखल करावाच लागणार”, असं म्हटलं.

- Advertisement -

23 एप्रिलच्या संध्याकाळी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यावेळी किरीट सोमय्या हे खार पोलीस स्टेशनमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेण्यासाठी आले होते.


हेही वाचा – 

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -