घरमहाराष्ट्रएखादा माथेफिरू ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असल्यास त्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष...

एखादा माथेफिरू ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असल्यास त्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करा : संजय राऊत

Subscribe

या देशात कोणत्या प्रकारचं वातावरण आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कोणत्या प्रकारे गैरवापर केला जातो. न्यायालयांवर कशा प्रकारे दबाव आणला जातोय. विरोधी पक्ष अनेक राज्यांत कसा दहशतीखाली आहे. यासंदर्भात, मानवी हक्कासंदर्भात जागतिक पातळीवरती चिंता व्यक्त केलेली आहे.

मुंबईः शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांवर हल्ला चढवला आहे. कोणी एखादा माथेफिरू वेडा स्वतःवरती हल्ला झाला, हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि तो टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावा असं सांगत असेल. तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी किरीट सोमय्यांवर टीकास्त्र डागलं आहे. शिवसेनेचे संजय राऊत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

त्यांची भूमिका ही लोकशाहीवादी आहे. महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांचं नेतृत्व नरेंद्र मोदी करतायत. अशा पक्षाची लोक लोकशाहीविषयी प्रवचनं झोडतायत ही आनंदाची गोष्ट आहे. मला देवेंद्र फडणवीसांचं कौतुकही आहे. काल शरद पवारांनी चांगलं वक्तव्य केलेलं आहे. सरकार सत्तेत पुन्हा येऊ शकत नाही, सरकार येण्याची प्रबळ इच्छा होती. येण्याची उबळसुद्धा होती. तरी सत्तेत न आल्यामुळे जी अस्वस्थता आहे. त्यातून अशा प्रकारची वक्तव्य विरोधी पक्षाचा लाऊडस्पीकरमधून बाहेर पडतायत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

- Advertisement -

या देशात कोणत्या प्रकारचं वातावरण आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कोणत्या प्रकारे गैरवापर केला जातो. न्यायालयांवर कशा प्रकारे दबाव आणला जातोय. विरोधी पक्ष अनेक राज्यांत कसा दहशतीखाली आहे. यासंदर्भात, मानवी हक्कासंदर्भात जागतिक पातळीवरती चिंता व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे नेमके कोणत्या हिटलरशाहीविषयी बोलतायत, ते समजून घ्यावं लागेल. राज्याचे विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांना जर लोकशाहीची इतकी चिंता आहे, तर त्यासंदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. त्यांनी जी भूमिका व्यक्त केलीय ती फक्त महाराष्ट्राविषयी नसेल. राष्ट्रीय स्तरावरची असू शकते, संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारची हुकूमशाही निर्माण झाली आहे का?, अशी चिंता अनेकांनी व्यक्त केल्याचंही संजय राऊतांनी आहे.

महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरेंना ओळखतात, जे शरद पवारांना ओळखतात. त्यांना हे कळेल की डेमोक्रॅटिक सरकार, लोकशाहीवादी सरकार हे संपूर्ण देशामध्ये नसेल. महाविकास आघाडीचं सरकार हे लोकशाहीवादी आहे. कोणी एखादा माथेफिरू वेडा स्वतःवरती हल्ला झाला, हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि तो टोमॅटो सॉस लावून राष्ट्रवादी राजवट लावा, असं सांगत असेल, तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन महिन्यात 17 खून आणि बलात्कार झालेले आहेत. हिटलरशाही काय आहे, हुकूमशाही काय आहे, कायदा-सुव्यवस्था कोसळणं काय आहे हे आपण पाहायला पाहिजे. आसाम सरकारनं गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक केली. का तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात त्यानं ट्विट केलं. अटक करून सुटका झाल्यानंतरही त्यांना पुन्हा अटक केली. आणि वारंवार अटक केली. हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे. या मुद्द्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी मन मोकळं केलं पाहिजे. कारण त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो. कारण त्यांना जी लोकशाहीची उबळ आलेली आहे. ती राष्ट्राच्या हिताची आहे. ते सत्तेत येऊ शकले नाही आणि पुढील 25 वर्षे येण्याची सूतराम शक्यता नाही. त्यातून जी काही त्यांची अस्वस्थता निर्माण झालेली आहे. जर त्यांचं मन अशांत असेल तर एकच उपाय आहे की त्यांनी आपल्या घरातील देवघरात हनुमान चालिसा वाचावी आणि मन शांत करावं, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावलाय.


हेही वाचाः उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गावर अपघात; उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून 1 ठार तर 2 जखमी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -