घरताज्या घडामोडीRussia Ukraine war : युक्रेनच्या ५ रेल्वे स्थानकांवर रशियाचा हल्ला, रिफायनरी, वीज...

Russia Ukraine war : युक्रेनच्या ५ रेल्वे स्थानकांवर रशियाचा हल्ला, रिफायनरी, वीज कंपन्या उद्ध्वस्त, अनेकांचा मृत्यू

Subscribe

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्याप सुरुच आहे. रशियाने युक्रेनच्या ५ रेल्वे स्थानकांवर निशाणा साधत हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या स्टेशनवर हल्ला करण्यात आला आहे ते यु्क्रेनच्या मध्य आणि पश्चिम भागातील आहे. तसेच रशीयाच्या समीमावर्ती भागातील ब्रियांस्क भागात तेल कंपनीला आग लागली आहे. या भीषण आगीतमुळे जिवीतहानी झाल्याची माहिती अद्याप आली नाही. तसेच आग लागण्यामागचे कारणही समोर आले नाही. युक्रेनने हल्ला केला नसल्याचे स्पष्ट सांगितले नाही. गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा रशियाच्या सीमेत घुसून हवाई हल्ला केला असल्याचा आरोप युक्रेनवर करण्यात आला आहे.

रशियाच्या सैन्याने यूक्रेनमधील क्रिमेनचुक भागातील तेल कारखान्यावर आणि वीज निर्मिती कंपण्यांवर मिसाईलद्वारे हल्ला केला आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही लोकं मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या विनित्सियाच्या दोन भागावर रशियाने रॉकेट हल्ला केला. युक्रेन सैन्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मारीपोलच्या अजोवास्टाल स्टील कंपनीत असणाऱ्या सैन्यावर आणि नागरिकांवर मिसाईल डागण्यात येत आहेत. कंपनीत दोन हजार जवान आणि १ हजार नागरिक अडकले आहेत. नागरिकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि युक्रेनच्या सरकारकडून मदत मागितली आहे. रशियाने त्या नागरिकांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे परंतु नागरिक त्याला तयार नाहीत.

- Advertisement -

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की, रशियन एजन्सींनी ज्येष्ठ रशियन पत्रकार व्लादिमीर सोलोव्‍यॉव्‍ह यांची हत्‍येचा कट उघड केला आहे. याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांतील एजन्सी या हत्येच्या कटात सामील होत्या. सोलोव्योव्ह हे युक्रेनवर रशियन सैन्याच्या हल्ल्याचे समर्थक होते.

हल्ल्यामुळे अनेक ट्रेन रद्द

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या रेल्वेने पश्चिम आणि मध्यभागी गाड्या रद्द केल्या आहेत किंवा वळवल्या आहेत. पाच स्थानकांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, ज्यात ल्विव्हजवळ क्रॅस्नेचा समावेश होता, जेथे ओव्हरहेड लाईन्सला वीजपुरवठा करणार्‍या ग्रिडवर परिणाम झाला. रेल्वे मार्ग हे युक्रेनच्या युद्ध प्रयत्नांचा अविभाज्य भाग आहेत, पोलंडमध्ये आणि बाहेर सैन्य आणि सैन्य उपकरणे वाहतूक करतात. पोलंडमध्ये नाटोचे लॉजिस्टिक सेंटर आहे.

- Advertisement -

हेही वाचा : उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गावर अपघात; उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून 1 ठार तर 2 जखमी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -