घरताज्या घडामोडीगुणरत्न सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ, न्यायालयाचा मोठा निर्णय

गुणरत्न सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ, न्यायालयाचा मोठा निर्णय

Subscribe

वकील गुणरत्न सदावर्ते यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला केला. या कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक कऱण्यात आले आहे. सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सदावर्तेंची पोलीस कोठडी संपली होती यामुळे त्यांना किला कोर्टात पुन्हा हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान पोलिसांनी सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. सदावर्ते यांच्याविरोधात काही पुरावे असून अजून चौकशी करायची असल्याची मागणी केली होती. सुनावणीदरम्यान सदावर्ते यांच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सदावर्ते पुढील २ दिवस पोलीस कोठडीत असतील. त्यांची पोलीसांकडून चौकशी करण्यात येईल.

वकील गुणरत्न सदावर्ते यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. पोलिसांना तपासादरम्यान काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. यामुळे ११ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. परंतु कोर्टाने सदावर्तेंची पुढील २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून १ कोटी ८० लाख रुपये जमा केले असल्याचा आरोप सरकारी वकिलांनी कोर्टात केला आहे. तसेच हे पैसे कोणी घेतले आणि कोणाला वाटण्यात आले? याचा तपास करायचा आहे. तसेच हल्ल्याच्या दिवशी आणि आदल्या दिवशी सदावर्तेंच्या संपर्कात एक-दोन व्यक्ती होते. या व्यक्तींची समोरा-समोर चौकशी करायची असल्यामुळे पोलीस कोठडीची मागणी कऱण्यात आली होती. मुंबई पोलीस आता पुढील दोन दिवस सदावर्ते यांची आरोपींशी समोरा समोर बसवून चौकशी करणार आहेत.

- Advertisement -

सच्चिदानंद पुरीला अटक

एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यात सच्चिदानंद पुरी या आरोपीचाही समावेश असल्याचा आरोप मुंबई पोलिसांकडून करण्यात आला होता. तसेच सच्चिदानंद पुरी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात सच्चिदानंद पुरी सदावर्ते यांच्या संपर्कात होता असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. पुरीसह आणखी ३ आरोपी या प्रकरणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सदावर्तेंना नागपूरमधून एक फोन आला त्याचे नाव सांगू शकत नाही तर तो फोन कोणाचा होता हे तपासात समोर येईल. तसेच फडींग गोळा केले त्यातून घोटाळा केला असल्याचा दावा सकारी वकील घरत यांनी केला आहे. तसेच १२ एप्रिलला बारामती काही होणार असल्याचे वक्तव्य करण्यात येत होते. परंतु हे पोलिसांना भ्रमित करण्यासाठी बोलण्यात येत होते असा युक्तीवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात केला आहे.


हेही वाचा : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात आरोपी चंद्रकांत सूर्यवंशीची एन्ट्री, सदावर्तेंच्या संपर्कात असल्याचा प्रदीप घरतांचा दावा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -