घरमहाराष्ट्रकोल्हापुरात आम्हाला कोणी रोखूच शकत नाही; सोमय्यांचं खुलं आव्हान

कोल्हापुरात आम्हाला कोणी रोखूच शकत नाही; सोमय्यांचं खुलं आव्हान

Subscribe

कोल्हापुरात आम्हाला कोणी रोखूच शकत नाही, असं खुलं आव्हान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या समर्थकांना दिलं आहे. ते सातारा येथे बोलत होते. सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर असून हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांची तक्रार करण्यासाठी मुरुगूड पोलीस ठाण्यात जाणार आहेत.

आई आंबेचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. आता सिध्दी विनायकानं आशीर्वाद दिले, की सगळी विघ्न दूर होतील आणि तशी मला खात्री आहे, असं सोमय्या म्हणाले. तसंच, आज कोल्हापूरला आंबे माताचं दर्शन घेऊन मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफांच्या घोटाळ्याची तक्रार करणार आहे. त्यामुळे लगेचच हसन मुश्रीफांचे घोटाळे बाहेर येऊन कारवाई सुरु होईल, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला. सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास मनाई करण्यात आली होती. तसंच, मुश्रीफ यांच्या समर्थकांनी देखील सोमय्यांना इशारा दिला होता. यावर बोलताना त्यांनी सवाल ही पैदा नहीं होता म्हणत कोणी आम्हाला रोखू शकत नाही. आता आम्ही घोटाळामुक्त महाराष्ट्र आम्ही करुनच थांबणार आहोत, असं सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

कोल्हापूर प्रवेश बंदी उठवली

हसन मुश्रीफ यांनी ज्या कारखान्यात भ्रष्टाचार केला त्याची पाहणी करण्यासाठी सोमय्या २० सप्टेंबर रोजी कोल्हापुरला येणार होते. मात्र, त्यांच्या येण्याने कोल्हापुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कोल्हापूर प्रवेशास मनाई केली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी आदेश काढत कोल्हापूर प्रवेश बंदी उठवली आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -