घरताज्या घडामोडी'या' माजी आमदाराच्या मुलाकडून मतदारांना जीवे मारण्याची धमकी

‘या’ माजी आमदाराच्या मुलाकडून मतदारांना जीवे मारण्याची धमकी

Subscribe

कोल्हापूरत ग्रामपंचायत निवडणूक प्रचारावेळी माजी आमदाराच्या मुलाने मतदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामपंचायत तिरवडे गावातील लोकनियुक्त सरपंचसाठी माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या स्नुषा शुभांगी विश्वजीत जाधव निवडणूक रिंगणात आहेत.

कोल्हापूरत ग्रामपंचायत निवडणूक प्रचारावेळी माजी आमदाराच्या मुलाने मतदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामपंचायत तिरवडे गावातील लोकनियुक्त सरपंचसाठी माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या स्नुषा शुभांगी विश्वजीत जाधव निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या प्रचारावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे चिरंजीव विश्वजित जाधव यांनी मतदारांना धमकी दिल्याचे समजते. (kolhapur former mla son threatens to kill voters in gram panchayat elections)

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील तिरवडे ग्रामपंचायत निवडणूक प्रचारामध्ये विनापरवाना प्रचारसभेत मतदारांना व विरोधी उमेदवारांना जिवे मारण्याची धमकी माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे चिरंजीव विश्वजित जाधव यांनी दिली. निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी रात्री परवानगी न घेता बेकायदेशीरर शुभांगी जाधव यांच्या सांगणेवरुन विश्वजीत जाधव यांनी कुदरवाडी या ठिकाणी सभा घेतली.

- Advertisement -

यावेळी मतदारांना व विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना “मागच्या वेळी वाचलास… काय वाट्टेल ते झाले तरी आम्हाला येथे शुभांगीची सीट निवडून येणे गरजेचे आहे, जर शुभांगीचं काय झालं, तर इथं वाईट परिणाम होणार एवढच सांगतो”, असे वक्तव्य केले.

विश्वजित जाधव यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

सामाजिक शांतता भंग करण्याचे व कायदेशीर सुव्यवस्था बिघडवणेचे उद्देशाने प्रक्षोभक वक्तव्य केलेले आहे. मतदारांना धमकावून भिती दाखवून आचारसंहिता भंग केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.


हेही वाचा – समृद्धी महामार्गावर एवढा टोल कसा? जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -