घरताज्या घडामोडीसमृद्धी महामार्गावर एवढा टोल कसा? जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

समृद्धी महामार्गावर एवढा टोल कसा? जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

Subscribe

समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या महामार्गाच्या टोलवरून सरकावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई आणि नागपूरकरांसाठी महत्वाचा असलेला समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. नुकताच ११ डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी मार्गाचे उद्धाटन केले. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र या मार्गावरील टोल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अशातच राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी समृद्धी महामार्गावर एवढा टोल कसा? असा सवाल राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे. (ncp leader jayant patil talk on samruddhi highway toll price shinde fadnavis govt about)

समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या महामार्गाच्या टोलवरून सरकावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. “समृद्धी महामार्गासाठी भरावा लागणारा टोल चर्चेचा विषय ठरत आहे. हा टोल सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. टोलच्या अवाजवी दरांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून त्याबाबत सरकारला जाब विचारणार आहे. प्रचंड मोठी गुंतवणूक त्या प्रकल्पात झाली आहे. आम्ही विधानसभेत मुख्यमंत्री आणि त्या खात्याच्या मंत्र्यांना विचारू की हा टोल एवढा कसा? त्याचे काहीतरी गणित किंवा हिशोब असेल. या निर्णयाप्रत ते का आले? त्यांचे उत्तर जर योग्य नसेल, तर त्याविरोधात आवाज उठवेन”, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -

“आत्ता जे टोलचे दर आहेत ते सामान्य माणसाला परवडणारे नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका रस्त्याला टोल घेतला, तर लोक त्या रस्त्यावरून जाण्याऐवजी जुन्या मार्गाने जाणेच जास्त पसंत करतील. या रस्त्यावर इतका टोल लावण्याचे कारण काय? हे आम्ही त्यांना विधानसभेत विचारू”, असे जयंत पाटील सांगितले.

शिवाय, “विदर्भातील जनतेसाठी ही फार मोठी अडचण आहे. रस्ता उत्तम आहेच. पण मग विमानही आहेच की. विमानाने जास्त लवकर येता येईल. त्यामुळे राज्य सरकारने स्वत: काहीतरी विचार केला पाहिजे. जनतेला कमी भुर्दंड ठेवला पाहिजे. तसे यात दिसत नाही. पण तरी सरकारची बाजू ऐकून घेतल्यावर आम्ही भूमिका व्यक्त करू”, असेही जयंत पाटील यांनी म्हणाले.

- Advertisement -

समृद्धी महामार्गावरील टोलची माहिती :

  • समृद्धी महामार्गावर वाहनांना एकूण १८ टोलनाके पार करावे लागणार
  • या एकूण ५२० किलोमीटर मार्गासाठी हलक्या वाहनांसाठी ८९९ रुपयांपर्यंत टोल भरावा लागणार
  • मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत ७०१ किलोमीटरचा पूर्ण प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास १२०० रुपये टोल भरावा लागणार

हेही वाचा – बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्य केले नसते तर हा वाद वाढला नसता : अजित पवार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -