घरमहाराष्ट्रKolhapur North Bypoll : जनाधार नसल्याने भाजपचा पैसे वाटून मतं विकत घेण्याचा...

Kolhapur North Bypoll : जनाधार नसल्याने भाजपचा पैसे वाटून मतं विकत घेण्याचा प्रयत्न – सतेज पाटील

Subscribe

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाची पाकिटं सापडली. पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावरुन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाष्य करताना भाजपवर हल्लाबोल केला. जनाधार नसल्याने भाजपचा पैसे वाटून मतं विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात सतेज पाटील यांनी केला. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर सतेज पाटील यांनी भाष्य केलं. प्रचंड उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपने पैसे वाटून मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला असून हा प्रयत्न जनता हाणून पाडेल. भाजप पैसे वाटून मतं घेतं हे स्पष्ट झालं आहे. भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जनाधार नसल्यानेच भाजपने पैसे वाटले, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देखील प्रत्युत्तर दिलं. चंद्रकांत पाटील सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसकडून कोणत्याही ठिकाणी पैशांचं वाटप करण्यात आलेलं नाही, असं सतेज पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

- Advertisement -

पराभव दिसू लागल्याने भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे – चंद्रकांत पाटील

पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था करत असताना कार्यकर्त्यांना पकडलं. कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था करायची नाही. तो काय पैसे वाटताना सापडला का? सर्वसामान्य माणसाला माहिती आहे की पराभव दिसत असल्यामुळे हे सगळं होतं आहे. याचा मतदारांना काही परिणाम होणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपला बदनाम करण्याचं विरोधकांचं काम – केशव उपाध्ये

या प्रकरणावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही प्रकारचे पैसे वाटण्याचं काम भाजपकडून सुरु नाही. हे सर्व भाजप विरोधकांचा अपप्रचार असू शकतो. भाजपला बदनाम करण्याचे विरोधकांचे काम सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोल्हापुरात मतदारांना पैशाचं आमिष? भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात सापडली पैशाची पाकिटं


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -