घरटेक-वेककार्ड नको, ॲप नको फक्त हाताच्या इशाऱ्याने करा पेमेंट; पाहा 'ही' भविष्यातील...

कार्ड नको, ॲप नको फक्त हाताच्या इशाऱ्याने करा पेमेंट; पाहा ‘ही’ भविष्यातील टेक्नोलॉजी

Subscribe

मनुष्याच्या शरीरात बसवता येणारी पेमेंट चिप विक्री करण्यास सुरुवात केल्याचा दावा ब्रिटीश-पॉलिश स्टार्टअप वॉलेटमोरने केला आहे. कंपनीने म्हटले की, आतापर्यंत ५०० पेमेंट चिपची विक्री केली गेली आहे. या चिपच्या मदतीने तुम्ही डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा रोख शिवाय दुकान, मॉल, रुग्णालय इत्यादी ठिकाणी पैशांचा व्यवहार करू शकता. यासाठी फक्त तुमचा हात कॉन्टेक्सलेस पेमेंट मशीनजवळ घेऊ जावा लागेल आणि तुम्हाला बँकेतून पैसे दुकानदारच्या अकाऊंटमध्ये पाठवावे लागतील.

पुढे कंपनीने म्हटले की, ही चिप पूर्णपणे सुरक्षित आहे. सर्व प्राधिकरणांनी याला मान्यता दिली आहे. वॉलेटमोरच्या माहितीनुसार, ही चिप निअर फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी) तंत्रज्ञानावर काम करते. याच तंत्राचा वापर स्मार्टफोनमधून कॉन्टेक्सलेस पेमेंट करताना केला जातो. तर काही इतर पेमेंट इंप्लांट्स रेडिया फ्रीक्वेंसी आयटेंटिफिकेसनवर (आरआयएफडी) काम करते. आरआयएफडी तंत्राचा वापर कॉन्टेक्टलेस डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमध्ये वापर केला जातो. दरम्यान मनुष्याच्या शरीरात सर्वात पहिल्यांदा चिप 1998मध्ये बसवण्यात आली होती.

- Advertisement -

काय आहे ही चिप?

कंपनीच्या माहितीनुसार, ही चिप १ ग्रॅमपेक्षा कमी वजनाची आहे आणि हिचा आकार तांदळाच्या एका दाण्यापेक्षाही कमी आहे. यामध्ये एक मायक्रोचिप आणि अँटीना आहे. ही चिप एका इंजेक्सनच्या माध्यमातून मनुष्याच्या शरीरात टाकली जाते. या चिपला चार्ज करण्याची गरज नाही आणि हे चिप आपल्या जागेवर स्थिर राहते. या चिपमध्ये वापरण्यात आलेले साहित्य नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे.

पेमेंटसाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये असणे आवश्यक

या पेमेंट चिपचा रीडिंग डिस्टेंस खूप कमी आहे. या चिपद्वारे पेमेंट करण्यासाठी ही चिप कोणत्याही आरआयएफडी किंवा एनएफसी रीडरच्या इलेक्ट्रोमॅग्रेटिक झोनमध्ये असावे. त्यामुळे जेव्हा रीडर आणि ट्रोन्सपॉन्डरमध्ये इलेक्ट्रोमॅग्रेटिक कपलिंग होईल तेव्हा पेमेंट होईल.

- Advertisement -

सुरक्षेबाबत चिंता

2021मध्ये युरोपिय संघ आणि युकेमध्ये 4000 लोकांमध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये 51 टक्के लोकं म्हणाले की, ते चिप बसवण्याबाबत विचार करू शकतात. अलीकडेच एका अभ्यासातून समोर आले की, लोकांमध्ये या पेमेंट चिपसंबंधित सर्वात मोठी समस्या ही सुरक्षासंबंधित आहे. फिनटेक तज्ज्ञ म्हणतात की, यामुळे गोष्टी सुलभ होतात, परंतु लोकांना हा सुद्धा विचार करावा लागेल की, सुविधेसाठी काय त्याग करण्यास तयार आहेत. वापरकर्त्यांनी गोपनीयता आणि सुविधा यांच्यातील सीमारेषा कुठे असावी हे ठरवायचे आहे.


हेही वाचा – आता गुगल मॅपच्या नवीन फीचर्समुळे प्रवासापूर्वीच टोल टॅक्सची किंमत समजणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -