घरमहाराष्ट्रविधानसभेचे विशेष अधिवेशन आज

विधानसभेचे विशेष अधिवेशन आज

Subscribe

कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी निवड

राज्यातील सुरू असणार्‍या सत्तासंघर्षात अखेर राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याचे आदेश विधिमंडळाला दिले आहेत. बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होईल. राज्यपालांनी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे कालिदास कोळंबकर हे नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल.

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर बुधवारी त्यावर कोर्टाने निकाल दिला. त्यानुसार हंगामी अध्यक्ष निवडून त्यांच्यामार्फत बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या आदेशानुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनावर हंगामी अध्यक्ष म्हणून भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांना शपथ दिली. तसेच अध्यादेश काढून बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

या विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्याचे काम करतील. सर्व आमदारांची शपथ पूर्ण झाल्यानंतर विधानसभेचा अध्यक्ष निवडला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाईल. मुख्यमंत्रीपदाची शपथ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधान भवनात नव्हेतर शिवाजी पार्कवर घेणार असल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -