घरमहाराष्ट्र'मांडवी'एक्स्प्रेसचे दरवाजे न उघडल्याने चाकरमानी संतप्त; रेल्वेचे नुकसान

‘मांडवी’एक्स्प्रेसचे दरवाजे न उघडल्याने चाकरमानी संतप्त; रेल्वेचे नुकसान

Subscribe

खेड स्थानकातील गर्दी पाहून 'मांडवी'एक्स्प्रेसचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

गौरी गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर अनेक चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यामुळे मुंबईला येणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी असून त्या प्रवाशांनी खचाखच भरल्या आहेत. आज मांडवी एक्स्प्रेस देखील मुंबईकडे रवाना झाली. दरम्यान, खेड स्थानकात ही एक्स्प्रेस थांबली. मात्र, प्रवाशांनी दरवाजे न उघडल्याने प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्यांचे या गाडीचे आरक्षण होते त्या प्रवाशांना गाडीकडे बघत राहावे लागले. त्यामुळे हतबल झालेल्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकात गोंधळ घातला. अनेक प्रवाशांनी एक्स्प्रेसच्या खिडक्या आणि दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे रेल्वेचे नुकसान झाले असून सुमारे अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरू असल्याने इतर प्रवाशांना याचा नाहक त्रास झाला असल्याची माहिती वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली.

यामुळे दरवाजे उघडले नाही

कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या आधीच दोन तास उशिरा धावत आहेत. त्याप्रमाणे मांडवी एक्स्प्रेस देखील उशीराने खेड स्थानकात दाखल झाली. मांडवी एक्स्प्रेस खचाखच भरल्यामुळे ती खेड स्थानकात थांबली. मात्र, खेड स्थानकातील गर्दी पाहून प्रवाशांनी गाडीचे दरवाजे लावून घेतले. गाडीच्या आतील प्रवाशांनी दरवाजे आणि खिडक्या लावून घेतल्या. त्यामुळे प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त करत एक्स्प्रेसच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांनी खेड स्थानकात गर्दी केली होती. मांडवी एक्स्प्रेस ३ वाजून ५६ मिनिटांनी खेड स्थानकात थांबते. मात्र, आज आधीच उशिरा धावत असलेल्या मांडवी खेड स्थानकात थांबून देखील प्रवाशांनी दरवाजे न उघडल्याने परिणामी संतप्त प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. अखेर अर्धापाऊण तास हा प्रकार झाल्यानंतर मागून हॉलिडे एक्स्प्रेस येत असल्याची उद्घोषणा झाली. त्यात अतिरिक्त डबे असल्याची उद्घोषणा कोकण रेल्वे प्रशासनाने केली आणि प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

- Advertisement -

हेही वाचा  – इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना ‘चांद्रयान २’ सापडले!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -