घरमहाराष्ट्र"जालनाच्या घटनेची कोणी जबाबदारी घेण्यास तयार नाही", ठाकरेंचा राज्य सरकारवर आरोप

“जालनाच्या घटनेची कोणी जबाबदारी घेण्यास तयार नाही”, ठाकरेंचा राज्य सरकारवर आरोप

Subscribe

भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत

मुंबई : जालन्याच्या घटनेची कोणी जबाबदारी घेण्यास तयार नाही, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला आहे. आज ठाकरे गटात साजन पाचपुते यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी साजन यांच्या 250 ते 300 कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला आहे. यावेळी साजन पाचपुते यांना ठाकरे गटाचे उपनेते पद देण्यात आल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी दिली आहे. साजन पाचपुते हे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत.

जालनासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी जालन्यात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आलो. वाईट एका गोष्टीचे वाटते की, हे सरकार निर्घृण तर आहेच. ऐवढे निर्घृण सरकार मी यापूर्वी कधी पाहिले नाही आणि निर्लज्ज आहे. माझ्या महिलांची डोकी फोडली. ते आंदोलनकर्ते हात जोडून सांगत होते की, मारू नका. आम्ही शांततापूर्ण आंदोलन करतोय, तरी सुद्धा बेच्छुट लाठीमार केला. हावेत गोळीबार केला, हावेत अश्रुधूर सोडले आहेत. आता त्यांची जबादारी घेईला कोणी तयार नाही. तुम्ही काय केले होते आणि यांनी काय केले होते. ते केले होते, म्हणून तर तुम्ही बसलात ना. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो. तेव्हा मराठा आंदोलन होत नव्हते, अशातला भाग नाही ना. आपले सरकार असताना तुमच्यावर लाठ्या चालविल्या होत्या का? कधीच नाही कारण तुम्ही न्याया हक्कासाठी बसलेला आहात. हे सरकार सर्वांना संकेत देते की, जर कोणी न्याया हक्कासाठी न्याया मागाल, तर आम्ही डोकी फोडून टाकू. हे असे सरकार पाहिजे का?”, असे म्हणत राज्य सरकारवर उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वटहुकूमासंदर्भात फडणवीसांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी दिले ‘असे’ उत्तर

अन्यायविरूद्ध भगवा फडकवायचा

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “बारसूच्या गरीब जनतेला ती रिफायनरी नको आहे. या बारसूला विरोध केल्यानंतर देखील तिथे बेछूट लाठीमार तिकडे केला. महिलांना असे मारले की, मला सांगता ही येत नाही. बोलयाला सुद्धा लाज वाटते, अशा पद्धतीने सरकार वागते. वारकऱ्यांवर देखील लाठीमार केला. हे नुसते म्हणजे कोणी बोलयाचे नाही, फक्त आम्ही जे करू तोच कायदा, आम्ही जे करू तो कायदा नाही, त्या कायद्या सकट हे सरकार तोडमोडून टाकू. भगवा लायवाचा म्हणजे नुसता भगवा नाही लावयाचा. अन्याय आणि अत्याचार करत आहेत. त्यांचा विमोड करून आपल्याला भगवा फडकवायचा आहे. तरच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा देण्याच्या लायक आपण ठरू.”

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी वटहुकूम का काढला नाही? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

साजन पाचपुतेबद्दल थोड्यात माहिती

भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे भाऊ सदाअण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडली. गेल्या काही महिन्यांपूर्वी काष्टी गावात झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते विरुद्ध प्रतापसिंह बबनराव पाचपुते या दोघांमध्ये लढत पाहायला मिळाली. तसेच श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत साजन पाचपुतेंनी बबनराव पाचपुते यांच्या विरुद्ध जिंकली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -