घरमहाराष्ट्रVideo : राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओ'वर आता रॅप साँग

Video : राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’वर आता रॅप साँग

Subscribe

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत न उतरताही प्रचारात चांगलीच रंगत भरली होती. राज ठाकरेंनी दहा सभा घेऊन मोदी आणि भाजपच्या जाहीरातबाजीचे व्हिडिओ सभांमधून दाखवले. ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे शब्द राज ठाकरेंच्या तोंडून बाहेर पडले की सत्ताधाऱ्यांना धडकी भरावी, एवढी दहशत या शब्दांनी निर्माण केली. लोकांनीही राज ठाकरेंच्या या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद दिला. आता मनसेने ‘लाव रे तो व्हिडिओ लाव’ असे रॅप साँग बनवले असून व्हिडिओची क्रेझ पुढे चालू ठेवली आहे.

- Advertisement -

मनसेचे नेते संदिप देशपांडे आणि नवी मुंबईचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी या गाण्याची निर्मिती केली असून याची संकल्पना योगेश चिले यांची आहे.

राज ठाकरेंच्या व्हिडिओला टक्कर देण्यासाठी काल भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ‘आता बघाच तो व्हिडिओ’ असे म्हणत राज ठाकरेंच्या विरोधातील व्हिडिओ दाखवले. मात्र सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात राज ठाकरेंच्याच व्हिडिओची चर्चा वरचढ राहिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -