घरक्रीडामुंबईकर होऊनही विराट मुंबईत मतदान करणार नाही; या शहरात करणार मतदान

मुंबईकर होऊनही विराट मुंबईत मतदान करणार नाही; या शहरात करणार मतदान

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजी-माजी क्रिकेटपटूंनी लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले होते. आपल्या अवाहनाच्या ट्विटमध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विरोट कोहलीला टॅगही केले होते. मात्र ज्याला लोकांना प्रोत्साहीत करायला सांगितले होते, तो स्वतःच मतदान करु शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. विराट कोहली मुंबईकर झाल्यानंतर इथल्या मतदार यादीत आपल्या नावाचा समावेश करण्यासाठी उशीर केल्याने त्याला मुंबईतून मतदान करता येणार नाही.

- Advertisement -

मात्र यावर आता विराटनेच तोडगा काढला आहे. विराट त्याच्या आधीच्या मतदारसंघातून मतदान करणार असल्याचे त्यानेच सांगितले आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी अॅड करून त्याने आपला जुना वोटर आयडी इन्स्टावर टाकला आहे. तसेच १२ मे रोजी आपण मतदान करणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.

kohli voting id card
विराट कोहलीचे मतदार ओळख पत्र

विराट कोहली हा लग्नानंतर पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबईत स्थायिक झाला. दोघांनाही यावेळी लोकसभेसाठी एकत्र मतदान करण्याची इच्छा होती. त्यासाठी कोहलीने ऑनलाईन प्रक्रियेनुसार अर्जही सादर केला होता. मात्र ३० मार्च ही शेवटची मुदत संपल्यानंतर अर्ज केल्यामुळे त्याचा अर्ज बाद झाला. परिणाम स्वरुप यावेळच्या मतदानाला कोहली मुकणार आहे.

- Advertisement -

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना मुंबईचे निवडणूक अधिकारी म्हणाले की, “विराट कोहलीचा अर्ज आम्हाला मिळाला आहे. मात्र तो प्रलंबित ठेवण्यात आला आहे. यावेळच्या निवडणुकीसाठी विराट मतदान करु शकणार नाही. मात्र त्यानंतर येणाऱ्या निवडणुकांसाठी त्याला मतदान करता येईल.” विराट स्वतः मुख्य निवडणूक आयुक्तांशी बोलून स्वतःचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासंबंधी प्रयत्न केले होते. मात्र मुदत संपल्यामुळे आयुक्तांचाही नाईलाज झाला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -