घरमहाराष्ट्रसत्तांतरापूर्वीच देवेंद्र फडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव, नेतेमंडळींचा फडणवीसांच्या घरी राबता

सत्तांतरापूर्वीच देवेंद्र फडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव, नेतेमंडळींचा फडणवीसांच्या घरी राबता

Subscribe

राज्यामध्ये सध्या अत्यंत वेगवान पद्धतीने राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहे. कुठल्याही क्षणी सत्तापालट होऊ शकते. दरम्यान,एकीकडे शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट शिवसेनेच्या पक्षप्रमुख तसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या विरोधातच बंड पुकारला आहे. शिंदेंच्या गटात आता 46 आमदार असून शिंदे भाजपशी हातमीळवणी करतात का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं, राजकीय नेत्यांचं लक्ष लागून राहीलं आहे. याच दरम्यान, गेमचेंजर मानले जाणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही पद्धतीचं भाष्य करणं अद्यापही टाळलं आहे. मात्र फडणवीसांच्या वर्षा या अधिकृत निवासस्थानी अनेक नेतेमंडळींचा राबता सुरू झालाय. सत्तांतराच्या पुर्वीच पुष्पगुच्छ घेऊन नारायण राणेंसह भाजपच्या गटातील आमदार , नेते फडणवीसांच्या भेटीला येत आहेत.(Leaders meet at Devendra Fadnavis’s house)

राज्यात सध्या राजकीय घमासान सुरू आहे. एकनाथ शिंदेंचं बंड थंड करण्यासाठी शिवसेनेतर्फे प्रयत्न केले जात आहे. मात्र आता माघार नाही अशीच भूमिका शिंदेनी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा पुरेपूर फायदा भाजप घेणार का?; एकनाथ शिंदे भाजप सोबत नवा घरोबा स्थापन करणार का?; या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. दरम्यान सध्या 46 आमदारांसह एकनाथ शिंदे हे आसाममधील गुवाहाटी मधील एका हॉटेलमध्ये असून आज तरी ते मुंबईत दाखल होणार नाहीये. यासह मुख्यमंत्री एककीडे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहे. यामुळे मुख्यमंत्री राजीनामा देणार का?, यावर देखील आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहीलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर मंत्र्यांच्या बैठका वाढल्याने आता सत्तानाट्य कधी पर्यंत रंगत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -


हे ही वाचा- उद्धव सरकार बरखास्त होणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील आजच्या मोठ्या 10 घडामोडी, वाचा सविस्तर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -