घरमहाराष्ट्रविधिमंडळाचे काम असंवैधानिक

विधिमंडळाचे काम असंवैधानिक

Subscribe

नव्या सरकारने बोलविलेले विशेष अधिवेशन हे नियमबाह्य आहे. संविधानाची पायमल्ली करुन हे सभागृहाचे कामकाज सुरु आहे. नियमाला धरुन हे अधिवेशन बोलविले नाही. राज्यपालांनी कोणत्याही प्रकारचे समन्स काढलेले नाहीत. त्यामुळे हे अधिवेशन असंवैधानिक असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे विद्यमान गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. तर नव्या सरकारने केलेल्या हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवडदेखील चुकीच्या पध्दतीने झाल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र विकास आघाडीच्या बहुमत चाचणीसाठी शनिवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविले होते

तसेच भाजप पक्षातर्फे मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी पटोले आणि कथोरे यांच्यामुळे चुरस रंगणार आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल करायचा आहे. काँग्रेसकडून नाना पटोले हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विधीमंडळ कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली आहे. तर भाजपकडून किसन कथोरे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असून 2014 साली ते 85 हजार 543 मतांनी विजयी झाले होते.

- Advertisement -

तर 2019 लाही ते मुरबाड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात उभे असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोटीराम पवार यांचा 26 हजार 230 मतांनी पराभव केला होता. भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून शेतकी संस्था स्थापन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उल्हासनगरच्या न्यायालयाने दिले होते.

दरम्यान, बहुमत चाचणीनंतर ही परीक्षादेखील महाराष्ट्र विकास आघाडी सहज जिंकेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे. तर भाजपकडून या अगोदरच गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आल्याने त्यांचीच निवड विरोधी पक्षेनेते म्हणून करण्यात येईल, हे निश्चित मानले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -