घरताज्या घडामोडीनिसर्ग चक्रीवादळामुळे उध्वस्त झालेल्या कोकणाला मदत करूयात!

निसर्ग चक्रीवादळामुळे उध्वस्त झालेल्या कोकणाला मदत करूयात!

Subscribe

कोकणच्या मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न करणे गरजेचे असून तातडीने खालील गोष्टींची मदत हवी आहे.

संपूर्ण कोकणपट्टीला निसर्गचक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. त्यात समुद्रकिनाऱ्या जवळच्या तालुक्याना तसेच डोंगरावरील गावे, वाड्या उध्वस्त झाल्या असून यात सर्वात जास्त झळ गरीब कुटुंबांना तसेच आदिवासी कुटुंबाला बसली असून त्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. डोंगरावर असणा-या वाड्या वस्त्यांना याचा सर्वात जास्त त्रास झाला असून घरांवरील पत्रे,  कौले उडून गेली असल्याने घरे उघडी पडली आहेत. घरातील होते नव्हते ते धान्य भिजून गेले आहे. काही घरे जमीनदोस्त झाली असून त्यांना अद्याप काही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. अशा उध्वस्त कोकणच्या लोकांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

गरीब तसेच आदिवासी लोकांनीच आसपास जागा शोधून तात्पुरत्या आस-याची सोय केलेली आहे. मात्र, पावसाळ्याचे दिवस असल्याने फार दिवस तिथे रहाणे फारसे सुरक्षित नाही. महाराष्ट्राच्या किनार्‍याच्या इलाख्यावर बेतलेल्या या संकट-समयी महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक संस्था एकत्र येऊन या परिस्थितीत शासनाने करायच्या उपाययोजना याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचे काम करत आहेत.

- Advertisement -

युसूफ मेहेरअली सेंटर, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट , सर्वहारा जन-आंदोलन, जन-आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, एस एम जोशी सोशालिस्ट फौंडेशन,  विद्रोही, मानवलोक, युवा, अनुभव शिक्षा केंद्र, युवा मित्र, सलोखा,संगिनी महिला जागृती मंडळ, नाशिक, डॉ आंबेडकर शेतीविकास व संशोधन केंद्र, लोकपंचायत, छात्रभारती, शिक्षकभारती, राष्ट्र सेवा दल इत्यादी सामाजिक संस्थांकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

या वेळेस इतर सर्व निकडी बाजूस ठेऊन आपण कोकणच्या मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न करणे गरजेचे असून तातडीने खालील गोष्टींची मदत हवी आहे. रायगड भागात : घरावर छप्पर- त्यासाठी पत्रे व कौले, ताडपत्री ( ते स्थानिक पातळींवर उपलब्ध होत नाही, कारण गरज खूप मोठी आहे), चादरी, पांघरूणे. रत्नागिरी भागात : मेणबत्त्या, टॉर्च, छोटे सोलर दिवे, चादरी, चटया, ताडपत्र्या

- Advertisement -

मदत देण्यासाठी इथे करा संपर्क

मदत तुकड्यांशी थेट संपर्क करण्यासाठी  : रायगड: उल्का महाजन,  मोबाईल:  ९८६९२३२४७८. रत्नागिरी: विकास घारपुरे  मोबाईल:  ८०८०२८८१६२ किंवा अभिजित हेगशेट्ये  मोबाईल:  ९४२२० ५२ ३१४.

वस्तुरूप मदत पोहचवण्यासाठी पुण्यातील पत्ता :   एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन , पत्रकार भवन शेजारी, नवी पेठ,  संपर्क- राहुल भोसले ९८२२९६२८५०

मदत पोहचवण्यासाठी मुंबईतील पत्ता :  युसुफ मेहेरअली सेंटर , संपर्क -गुड्डी  मोबाईल:   ७७३८० ८२१७०

मदत पोहचवण्यासाठी नागपुरातील संपर्क:  अतुल देशमुख    मोबाईल: ९९२१२ १५३३३. मदत पोहचवण्यासाठी नाशिकमधील  संपर्क:  नितीन मते  मोबाईल: ९३७२१ ५६००५. मदत पोहचवण्यासाठी कोल्हापूरधील  संपर्क:   धनाजी गुरव  मोबाईल:  ९४२२६ १६५३१. बँकेद्वारे मदत पाठवायची झाल्यास : राष्ट्र सेवा दल, संपर्क- शिवराज  मोबाईल: ७९७२० २४००१.


हे ही वाचा – पिल्लांवर कुऱ्हाडीने घाव, आईने घेतला असा बदला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -