घरताज्या घडामोडीसाहित्य, संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे यांची नियुक्ती

साहित्य, संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे यांची नियुक्ती

Subscribe

साहित्य क्षेत्रातील महत्वपुर्ण योगदान देणारे २९ सदस्यांची पुढ़ील तीन वर्षासाठी नियुक्ती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर जेष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय साहित्य क्षेत्रातील महत्वपुर्ण योगदान देणारे २९ सदस्यांची पुढ़ील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदी नियुक्ती करुन माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल मी पहिल्यांदा प्रशासनाचे आभार मानतो. यशवंतराव चव्हाण यांनी मंडळाची स्थापना केली. त्यावेळी तयार केलेल्या चौकटीत पुरेशी स्पष्टता आणि परिपूर्णता असल्याने आजवर मंडळाची वाटचाल सुयोग्य झाली. यापूर्वीही मंडळाला चांगले अध्यक्ष लाभले आहेत,असे डॉ. सदानंद मोरे यांनी म्हटले आहे.

मंडळावरील नियुक्त्या पुढीलप्रमाणे

अध्यक्ष : सदानंद मोरे, सदस्य : डॉ. प्रज्ञा दया पवार, श₹अरुण शेवते, डॉ.रणधीर शिंदे, निरजा, प्रेमानंद गज्वी, डॉ. नागनाथ कोतापल्ले, प्रवीण बांदेकर, मोनिका मजेंद्रगडकर, भारत सासणे, फ.मु.शिंदे, डॉ.रामचंद्र देखणे, डॉ.रविंद्र शोभणे, योगेंद्र ठाकूर, प्रसाद कुलकर्णी,प्रकाश खांडगे, प्रा. एल.बी.पाटील, पुष्पराज गावंडे , विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ. आनंद पाटील, प्रा. शामराव पाटील, दिनेश आवटी,शधनंजय गुडसुरकर, नवनाथ गोरे, रविंद्र बेडकीहाळ, प्रा. रंगनाथ पठारे, उत्तम कांबळे, विनोद शिरसाठ, आणि डॉ. संतोष खेडलेकर.

- Advertisement -

हेही वाचा – धोकादायक पुल, धरणांची सुरक्षितता तपासा : गमे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -