घरदेश-विदेशLive Update: भाजपाची पाचवी यादी जाहीर, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश

Live Update: भाजपाची पाचवी यादी जाहीर, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश

Subscribe

भाजपाची पाचवी यादी जाहीर, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश

कंगना राणौत, अरूण गोविल यांच्यासह मनेका गांधी, नवीन जिंदाल यांनाही उमेदवारी

- Advertisement -

भंडारा- गोंदिया येथून सुनील बाबुराव मेंढे, गडचिरोलीतून अशोक महादेव राव नेते आणि सोलापुर (अजा) येथून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

24/3/2024 21:13:23

- Advertisement -

चंद्रपूरमधून धानोरकर यांना उमेदवारी

24/3/2024 19:53:44


गुजरात टायटन्सला पहिला झटका; बुमराहने घेतली विकेट

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत गोलंदाजी घेतली. गुजरात टायटन्सने 31 धावांवर पहिली विकेट गमावली आहे.

24/3/2024 19:25:4


काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

24/3/2024 18:4:40


महादेव जानकर महायुतीसोबत;लोकसभेची एक जागा लढवणार

24/3/2024 17:34:32


अमरावती जिल्ह्यातील चिखलदराजवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात

एसटी बसमधून 20 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती

परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावर एसटी बस दरीत कोसळली

अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती

24/3/2024 15:22:28


मुंडे भाऊ-बहिण पहिल्यांदाच एकत्र परळीतील गोपीनाथ गडावर

कृषीमंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे एकत्र गोपीनाथ गडावर पोहोचले

पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता

24/3/2024 12:51:31


राजकीय संभावरील खर्चांवर इंदुरीकर महाराजांची टीका

कीर्तनकारांनी 5 हजार रुपये जादा घेतले तर धंदा मांडला अशी टीका

मात्र राजकीय सभांना 5 कोटींचा खर्च केला जातो, त्याचे काय?

24/3/2024 12:29:51


मोदी बागेत शरद पवारांच्या अनेक जण भेटीला

शहाजीबापू पाटलांचे पुतणे संग्रामसिंह पाटील शरद पवारांच्या भेटीला

ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेले कराळे गुरुजींनीही घेतली शरद पवारांची भेट

24/3/2024 10:0:0


महायुतीचे नेते तिसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर

राज्यातील जागा वाटपावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री झाली बैठक

बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित

दीड तास झालेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पहाटे 5.30 वाजता वेगवेगळ्या विमानांनी मुंबईत दाखल

बैठकीत पेच असलेल्या जागांवर निर्णय झाल्याची माहिती

आज किंवा उद्या महायुतीचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता

24/3/2024 8:13:18


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी बोलावली बैठक

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात बोलावली बैठक

या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतेले जाणार

900 एकरवर लवकरच मराठा समाजाची सभा होणार

सभा कुठे आणि कधी होणार याची देखील घोषणा आजच्या बैठकीत केली जाणार

आजच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

मनोज जरांगे आज मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील भूमिका मांडणार

24/3/2024 8:13:18

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -