Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशLive Update : अशोक सराफ यांना मानाचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान

Live Update : अशोक सराफ यांना मानाचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

Subscribe

अशोक सराफ यांना मानाचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान


22/2/2024 22:14:28 शरद पवार गटाला ‘तुतारी’ चिन्ह

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिला नवं चिन्ह


22/2/2024 22:14:28 माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती अत्यावस्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना 21 फेब्रुवारी 2024 रोजी हिंदुजा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांची प्रकृती अत्यावस्त आहे. त्यामुळे सध्या ते आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली आहेत.


22/2/2024 16:40:43 देशात तपास यंत्रणा घरगडी म्हणून काम करत आहे – उद्धव ठाकरे

आम्ही हुकूमशाही आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात


मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल

प्रकृती अस्वस्थामुळे मनोहर जोशी बुधवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले


गुलमर्गमध्ये हिमस्खलन, सात पर्यटक बेपत्ता

लष्कर, स्थानिक पोलिसांकडून बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू

बेपत्ता पर्यटकांमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश


सिल्व्हर ओकवर चार तास मॅरेथॉन बैठक

शरद पवार, जयंत पाटील यांच्यात झाली बैठक

पक्षाचे चिन्ह आणि नाव याबाबत बैठतकीत चर्ता झाल्याची माहिती

लोकसभेच्या जागांचा शरद पवारांनी जयंत पाटलांमार्फत घेतला आढावा


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर

28 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौऱ्यावर

बचत गटाच्या एक ते दीड लाख महिलांना करणार संबोधन


कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीकडून रास्तारोको

वंचितचे कार्यालय पाडकामप्रकरणी रास्तारोको

कोणतीही नोटीस न देता कार्यालय पाडण्यात आल्याचा वंचितचा आरोप

कुर्ल्यातील महापालिका कार्यालयासमोर वंचितच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

पोलिसांकडून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न


वाढवण बंदराविरोधात रास्तारोको आंदोलन

हातात काळे झेंडे घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले

वाढवण बंदराविरोधात डहाणूच्या चारोटी गावातून आंदोलनाला सुरुवात

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डहाणूत मोठा पोलीस बंदोबस्त


मुंबईतील हिरानंदानी ग्रुपवर ईडीचा छापा

मुंबईत अनेक ठिकाणी ईडीचा छापा

फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी छापे सुरू असल्याची माहिती


खासदार अनिल देसाईंच्या खासगी सचिवाविरोधात गुन्हा दाखल

सचिव दिनेश बोभाटेंविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

ईडीने केला गुन्हा दाखल


‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’ डॉक्युमेंटरीचे प्रदर्शन थांबवले

मुंबई हायकोर्टाचा नेटफ्लिक्सला दणका

वेब सीरिजमुळे खटल्यावर परिमाण होईल सांगत सीबीआयने घेतला आक्षेप


अरविंद केजरीवाल यांना ईडीचे समन्स

केजरीवालांना ईडीचे सातवे समन्स

सोमवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश


जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचा छापा

किरू हायड्रोइलेक्ट्रीक प्रकल्पाप्रकरणी छापा

30 पेक्षा अधिक ठिकाणी सीबीआयचा छापा


मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

वसई ते खाणिवडे टोल नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा


आमदार राजन साळवी यांची पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी

राजन साळवी यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम साळवी यांनी दाखल


राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून पुन्हा संपावर

प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने आज संध्याकाळी 5 वाजेपासून जाणार संपावर

यापूर्वी देखील 7 फेब्रुवारीला संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांकडून घेण्यात आला होता.

मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर संप स्थगित करण्यात आला


शेतकऱ्यांचा दिल्लीकडे निघालेला मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित

शुक्रवारी संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती ठरविली जाण्याची शेतकरी नेत्यांची माहिती

हरियाणा सीमेवर आंदोलन सुरू असताना एका २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती

पोलिसांनी मात्र ही अफवा असल्याचे सांगून वृत्त फेटाळले


ऊस शेती करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

केंद्र सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊसाचा FRP 8% नी वाढवला

मोदी सरकारचा ऊस उत्पादकांसाठी मोठा निर्णय

एफआरपी 8 टक्क्यांनी वाढवल्यामुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार

सुधारित एफआरपी 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्याच्या सूचना


भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची अशोक चव्हाणांनी घेतली भेट

भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाणांनी पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील पक्ष नेतृत्वाची घेतली भेट

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित