घरक्राइमNagpur Crime : आयटी कंपनीतील सहाय्यक व्यवस्थापकाची हत्या, तपासातून धक्कादायक कारण उघडकीस

Nagpur Crime : आयटी कंपनीतील सहाय्यक व्यवस्थापकाची हत्या, तपासातून धक्कादायक कारण उघडकीस

Subscribe

नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः नागपूरचे असून देखील त्यांच्याच जिल्ह्यात गुन्हेगारांवर कोणाचाही वचक राहिला नसल्याची टीका वारंवार करण्यात येत आहे. अशातच आता एका आयटी कंपनीतील सहाय्यक व्यवस्थापकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, पोलीस तपासातून या घटनेबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या सहाय्यक व्यवस्थापकाची हत्या ही त्याच्याचसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. व्यवस्थापकाच्या बॉसगिरीला कंटाळून दोन कर्मचाऱ्यांनी त्याची हत्या केल्याची सांगण्यात आले आहे. (Nagpur Crime: Murder of assistant manager in IT company)

हेही वाचा… Mumbai News:…अन् त्या महिलेच्‍या पोटातून काढला 5 किलो वजनाचा ट्यूमर

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर मिहान येथील हेक्सावेअर टेक्नॉलॉजी येथे 10 महिन्यांपासून सहाय्यक व्यवस्थापक पदावर एन.आर. लक्ष्मीनरसिंहम उर्फ देवनाथन हा काम करत होता. तो मनीषनगरमधील अग्निरथ संकुल येथे वास्तव्यास होता. देवनाथन याच्या कंपनीतच गौरव भीमसेन चंदेल आणि पवन अनिल गुप्ता हे दोघे कामास होते. तर देवनाथन आणि पवन हे रुम पार्टनरही होते. परंतु, असे असतानाही देवनाथन हा वारंवार गौरव आणि पवन यांच्या कामात चुका काढत असे. ज्यामुळे हे दोघेही त्याच्या बॉसगिरीला कंटाळले होते.

देवनाथन हा पवन आणि गौरवला वरिष्ठ होता. त्यामुळे तो वारंवार या दोघांच्या कामात चुका काढून त्यांना ओरडत असे. परंतु, देवनाथन इतर कामगारांच्यासमोर या दोघांवर रागवत असे, ज्याला हे दोघेही कंटाळले होते. त्यामुळे या दोघांनाही अपमानित झाल्यासारखे वाटत असे. ज्यामुळे या दोघांनी मिळून देवनाथन याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी मिळून सहाय्यक व्यवस्थापक देवनाथन याची चाकू भोसकून हत्या केली आहे. परंतु, या दोघांनी हत्येचा ज्या प्रमाणे कट रचला होता, त्यामुळे ही हत्या नसून पोलिसांना सुरुवातीला अपघात झाल्याचे वाटत होते. मात्र, पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केली असता, आरोपी पवन आणि गौरव यांनीच हत्या केली असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -