घरताज्या घडामोडीLok Sabah 2024 : घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत राष्ट्रवादी शरद पवार...

Lok Sabah 2024 : घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातून मोठं आश्वासन

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज (25 एप्रिल) पुण्यात प्रकाशित करण्यात आला.

पुणे : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज (25 एप्रिल) पुण्यात प्रकाशित करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्या जाहीरनाम्याला ‘शपथपत्र’ असे नाव दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या जाहीरनाम्यातील माहिती दिली. (Lok Sabah Election 2024 nationalist Congress Sharad Chandra Pawar party manifesto released)

गेल्या 10 वर्षांत मतदारांची झालेली फसवणूक, प्रचंड वाढलेली महागाई, 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी या देशात आहे, शेतकऱ्यांची दुरावस्था झालेली आहे. कॉर्पोरेटसाठी पक्षपाती धोरणं अवलंबून इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून प्रचंड देणगी घेण्याचे आणि सराकरी यंत्रणांचा गैरवापर केल्याचे पाहायला मिळाले. नोटबंदी तसेच, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात उभ्या राहिलेल्या सर्व गोष्टींचे खासगीकरण्यावर या सरकारचा भर आहे. महिला या देशात सुरक्षित नाहीत. पर्यावरणाचा हानी करणारा विकास आणि कायद्याची मोडतोड करण्यावर या सरकारचा भर आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही आमच्या शपथपत्रात भूमिका मांडली आहे. तसेच, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू ही भूमिका आम्ही या शपथपत्रात मांडली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शपथपत्रात काय?

  • स्वयंपाक घरातील गॅसच्या किमती आम्ही कमी करत त्या 500 रुपयांपर्यंत निश्चित करू. त्यासाठी अवशक्यता लागल्यास केंद्र सरकारकडून त्याला सबसीडी देईल. यूपीए सरकारच्या काळात जशा गॅसच्या किमती होत्या. त्याचप्रमाणे आता किमती ठेवल्या जातील.
  • पेट्रोल आणि डिजेलवरील कराची पुनर्रचना करू. देशातील महागाई वाढण्यासाठी पहिले कारण म्हणजे पेट्रोल-डिझेलचे दर आहे. हे दर आम्ही मर्यादीत ठेवू.
  • केंद्रात 30 लाखांहून अधिक शासकिय नोकऱ्या रिक्त आहेत. त्या रिक्त जागा आम्ही सरकारमध्या सामील झाल्यास भरू आणि देशातील जनतेला चांगली सेवा देण्याचा आग्रह करू.
  • शासकीय नोकरीत महिलांना 50 टक्के आरक्षण ठेवण्याचा आग्रह करू.
  • देशात जीएसटी कर नागरिकांना लुबाडण्याचे काम करत आहे. जीएसटी कराबाबत केंद्र सरकारचा हस्तक्षेप कमी ठेवत, संबंधित राज्यांना जीएसटी कर ठेवण्याचे अधिकार देऊ.
  • देशातील अप्रेंटिस कायदा मंजूर करताना एखादा विद्यार्थ्याने डिग्री आणि डिप्लोमामध्ये पदवी मिळवल्यास त्याला पहिल्या एक वर्षासाठी स्टायपेंड दिले जाईल. 8500 रुपये स्टायपेंड दिला जाईल.
  • आमचं सरकार आल्यावर देशातील स्पर्धा परीक्षांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ केले जाईल.
  • महिला आणि मुलींसाठी स्त्री शिक्षणात असलेले अडथळे आम्ही दूर करू.
  • समाज शाळा आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करू.
  • शाळा कॉलेजमध्ये सेफ्टी ऑडिट करू.
  • शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर. त्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करू
  • सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करू.
  • आरक्षणाची 50 टक्क्यांची अट दूर करण्यासाठी विशेष कायदा करू.
  • खाजगी कॉलेजमध्ये आरक्षण ठेवण्याचं काम करू.
  • जेष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करू.
  • आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4 टक्क्यांपर्यंत करू.
  • शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 टक्क्यांपर्यंत करू.
  • शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी असणार.
  • खाजगीकरण आम्ही मर्यादा आणू.
  • अग्निवीर योजना आम्ही बंद करू.
  • वन नेशन आणि वन इलेक्शन चर्चा करणे आता योग्य नाही, आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू.
  • प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ.
  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांची उडवली खिल्ली, म्हणाले…

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -