Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रनाशिकLok Sabha Election 2024 : नाशिकची उमेदवारी कोणाला? छगन भुजबळ, हेमंत गोडसे...

Lok Sabha Election 2024 : नाशिकची उमेदवारी कोणाला? छगन भुजबळ, हेमंत गोडसे मुंबईला रवाना

Subscribe

Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडणार आहे. पण याच जागेवरून महायुतीच्या नेत्यांची देखील डोकेदुखी वाढणार आहे. कारण या जागेसाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

नाशिक : नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडणार आहे. पण याच जागेवरून महायुतीच्या नेत्यांची देखील डोकेदुखी वाढणार आहे. कारण या जागेसाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. एकीकडे छगन भुजबळ यांना थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून ही जागा लढवण्याचे आदेश आले असताना, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नाशिक लोकसभेतील विद्यमान खासदार हेमंत गोडसे या जागेवर आपला दावा ठोकून आहेत. ज्यामुळे आता हे दोन्ही नेते मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. (Lok Sabha Election 2024: Chhagan Bhujbal and Hemant Godse in Mumbai to claim Nashik Lok Sabha seat)

हेही वाचा… Lok Sabha Election : आमचा दरवाजा ठोठावलात तर…; हेमंत गोडसेंच्या नाराजीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

- Advertisement -

नाशिक लोकसभेच्या जागेवर सुरुवातीपासूनच शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना आधीच उमेदवारी जाहीर केली. परंतु, त्यांच्या या उमेदवारीला भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेतेमंडळींकडून कडाडून विरोध करण्यात आला. ज्यामुळे या जागेवरील सुरू झालेला तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. त्यामुळे आता नाशिकची जागा शिवसेनेला सुटली नाही तर विद्यमान खासदार हेमंत गोडसे बंडखोरी करत अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. हेमंत गोडसेंनी बंडखोरी केल्यास नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहे.

तर, छगन भुजबळ यांना नाशिकची उमेदवारी मिळाल्याची माहिती समोर येताच खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबई गाठली आहे. हेमंत गोडसे आणि नाशिकमधील शिवसेना पदाधिकारी आज (ता. 02 एप्रिल) पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. पण त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड देखील मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नाशिकच्या जागेवरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून ही जागा नेमकी कोणाला सुटणार, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

- Advertisement -

खासदार हेमंत गोडसे मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीमध्ये ते पुन्हा नाशिक लोकसभेचे गणित मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. पण छगन भुजबळ मुंबईत येऊन कोणाची भेट घेणार? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे नाशिक लोकसभेबाबत नेमका काय निर्णय घेण्यात येणार आहे? यांकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. तर हेमंत गोडसे यांनी जर का बंडखोरी केली तर यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार, असल्याचेही निश्चित आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : राज्यातील 48 जागा जिंकण्याचा निर्धार; दिनेश शर्मांकडून विश्वास व्यक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -