नवी दिल्ली : लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक मागील 21 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. मात्र आज त्यांनी आपले उपोषण मागे घेत आपला लढा सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. (Sonam Wangchuks hunger strike called off after 21 days The fight will continue)
हेही वाचा – Ajit Pawar VS Rohit Pawar : रोहित पवारांना अजित पवारांचे दादा स्टाईल प्रत्युत्तर
लेह-आधारित सर्वोच्च संस्था आणि कारगिल लोकशाही आघाडी (KDA) यांच्या संयुक्त प्रतिनिधींमधील चर्चेच्या एका दिवसानंतर म्हणजेच 6 मार्च रोजी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी लेह-आधारित सर्वोच्च संस्था आणि कारगिल लोकशाही आघाडी या दोन्ही संघटना संयुक्तपणे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
#WATCH | Sonam Wangchuk, an engineer turned educational reformist called off his hunger strike today in Leh, Ladakh.
The hunger strike was for the statehood of Ladakh and the protection of the fragile Himalayan ecology. pic.twitter.com/TDjt2LUrIn
— ANI (@ANI) March 26, 2024
सोनम वांगचुक यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. तसेच लडाखच्या लोकांना राष्ट्रहितासाठी यावेळी अत्यंत काळजीपूर्वक मतदान करण्याचे आवाहनही केले होते. मात्र इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ते कमकुवत दिसत होते. अशातच आज त्यांनी 21 व्या दिवशी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
हेही वाचा – Baraskar Vs Jarange : जरांगेचे उपोषण सोडणाऱ्या महिलेकडे नवी कोरी गाडी कशी आली? बारसकरांचा सवाल
सोनम वांगचुक यांच्या प्रमुख मागण्या?
- इतर राज्यांप्रमाणे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा
- लडाखचा समावेश संविधानाच्या सहाव्या अनुसुचिमध्ये करावा
- लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी वेगळा लोकसभा मतदारसंघ असावा
- स्थानिक नागरिकांसाठी विशेष जमीन आणि नोकरीच्या हक्कांची मागणी
- लडाखमध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना व्हावी