घरमहाराष्ट्रKoshyari : उद्योगपती अंबानींकडून माजी राज्यपालांना 15 कोटींच्या देणग्या; निनावी पत्राने खळबळ

Koshyari : उद्योगपती अंबानींकडून माजी राज्यपालांना 15 कोटींच्या देणग्या; निनावी पत्राने खळबळ

Subscribe

मुंबई : राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या वादग्रस्त भूमिकांमुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहिले आहेत. मात्र आता ते उद्योगपती अनंत अंबानी यांच्याकडून देणग्या घेतल्यामुळे चर्चेत आले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना भगतसिंग कोश्यारी यांनी अनंत अंबानी यांच्या घेतल्याचे निनावी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनिल गलगली यांनी हे निनावी पत्र राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून चौकशीची मागणी केली आहे. (Industrialist Anant Ambani donates Rs 15 crore to former Governor Bhagatsingh Koshyari Stir with anonymous letters)

हेही वाचा – Ajit Pawar VS Rohit Pawar : रोहित पवारांना अजित पवारांचे दादा स्टाईल प्रत्युत्तर

- Advertisement -

अनिल गलगली यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपालपदाच्या कार्यकाळात संस्थेने जमा केलेल्या देणग्यांबाबत माहिती मागवली होती. मात्र ही माहिती राजभवनकडे नसल्याचे त्यांना कार्यालयाने सांगितले. पण त्यानंतर अनिल गलगली यांना एक निनावी पत्र मिळाले. या पत्रात भगतसिंग कोश्यारी यांच्या संस्थेला अनंत अंबानी यांनी 15 कोटी रुपयांची देणची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अनिल गलगली यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल. त्यामुळे राज्यसरकार याप्रकरणी काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Sunetra Pawar : शरद पवार अनेक वर्षांपासून…; अजितदादांनी पक्ष चोरल्याच्या आरोपावर सुनेत्रा पवारांचे प्रत्युत्तर

- Advertisement -

निनावी पत्रात काय?

निनावी पत्रात नमूद केल्याप्रमाणे, भगतसिंग कोश्यारीसारख्या माणसाने आपल्या पदाचा उपयोग करून उत्तराखंडमधील एका शाळेच्या नावाने भरपूर देणग्या गोळा केल्या आहेत. 100 सुद्धा मुले नाहीत अशा शाळांकरिता त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या गोळा केल्या आहेत. या पैशातून भगतसिंह कोश्यारी यांनी आपला पुतण्या दीपेन्दरसिंग कोश्यारी याच्यासाठी शाळेच्या आसपास जमीन खरेदी करून त्याठिकाणी रिसॉर्ट सुरू केले आहे. अनंत अंबानी यांच्याकडून या शाळेसाठी 15 कोटी रुपये घेतले. शेर सिंग कार्की सरस्वती विहार विद्यालय, डिगरा मुवानी, चामू, कनालीछीना, पिथौरागढ उत्तराखंड देवस्थळी येथील संस्थांच्या नावाने संपत्ती गोळा केली आहे. 2019 पूर्वी संस्थांना किती देणग्या मिळाल्या आणि 2009 ते 2023 या कालावधीत किती देणग्या मिळाल्या या तुलना करण्यासाठी शकेल. Devbhumi Shiksha Prasar Samiti, Nainital Bank Haldwani Branch, Account No-0561000000000310 असं बँकेचं नाव आणि खाते क्रमांकसुद्धा निनावी पत्रातून देण्यात आलं आहे. तसेच एसबीआय बँकेतील एका खात्यातही अनेक व्यवहार करण्यात आल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -