घरमहाराष्ट्रनागपूरLok Sabha 2024 : विदर्भातील पाच जिल्ह्यात होणार पहिल्या टप्प्यात मतदान, अर्ज...

Lok Sabha 2024 : विदर्भातील पाच जिल्ह्यात होणार पहिल्या टप्प्यात मतदान, अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस

Subscribe

19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून बुधवार 27 मार्च हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचा दिवस आहे. महाराष्ट्रात विदर्भातील पाच जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

नागपूर : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून बुधवार 27 मार्च हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचा दिवस आहे. महाराष्ट्रात विदर्भातील पाच जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे उद्या बुधवारी, 27 मार्च दुपारी 3 वाजेपर्यंत प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह इच्छुक आपले अर्ज दाखल करतील. आज भाजपाचे नितीन गडकरी, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (Lok Sabha 2024 : Last day file applications for Lok Sabha elections to be held five districts of Vidarbha on Wednesday)

हेही वाचा… Navneet Rana : नवनीत राणांचे भवितव्य 1 एप्रिलला ठरणार, भाजपाकडे पर्यायी उमेदवार तयार

- Advertisement -

राज्यातील नागपूर, रामटेक, भंडारा -गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभेच्या पाच जागांसाठी येत्या 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदावरी अर्ज दाखल करण्याची 27 मार्च ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग असणार आहे. महायुतीत रामटेकची जागा शिवेसना शिंदे गट लढविणार आहे. मात्र, शिंदे गटाने येथील उमेदवार अजून घोषित केलेला नाही. आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आलेले राजू पारवे हे येथील उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी, रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर, गडचिरोली-चिमूरमधून डॉ. नामदेव किरसान हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, चंद्रपूरमधून भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार हंसराज अहिर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, माजी आमदार आशीष देशमुख आदी उपस्थित होते. तर नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या उपस्थितीत विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

- Advertisement -

आज संध्याकाळपर्यंत नागपूरमधून 19 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यात विकास ठाकरे यांच्या चार अर्जांचा समावेश आहे. रामटेकमध्ये सहा अर्ज आले असून त्यात वंचित बहुजन आघाडीच्या शंकर चहांदे यांच्या अर्जाचा समावेश आहे. भंडारा गोंदियामध्ये आठ तर गडचिरोली-चिमूरमध्ये भाजप उमेदवार अशोक नेते यांच्यासह पाच जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांच्यासह एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -