पुणे : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांनी जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. तसेच अजित पवार यांचा गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत पक्ष आणि चिन्ह त्यांना दिले. तेव्हापासून शरद पवार गटाकडून अजित पवारांवर पक्ष चोरल्याचा वारंवार आरोप होताना दिसतो. याचपार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भाष्य केले आहे. (Sharad Pawar for many years Sunetra Pawar response to the allegation that Ajit Dada stole the party)
हेही वाचा – Ajit Pawar VS Rohit Pawar : रोहित पवारांना अजित पवारांचे दादा स्टाईल प्रत्युत्तर
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर असल्या तरी महायुतीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाकडून सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी श्रीनिवास पवार, त्यांच्या पत्नी शर्मिला पवार, युगेंद्र पवार आणि रोहित पवार मैदानात उतरले आहे. तर सुनेत्रा पवार या सुद्धा बारामती मतदार संघाचा दौरा करत नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी अजित पवारांवर वारंवार पक्ष चोरल्याच्या आरोपावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
हेही वाचा – Baraskar Vs Jarange : जरांगेचे उपोषण सोडणाऱ्या महिलेकडे नवी कोरी गाडी कशी आली? बारसकरांचा सवाल
लोकशाही नेमकं कशाला म्हणायचं? सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, शरद पवार अनेक वर्षांपासून सांगत आले आहेत की, व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळालं पाहिजे. आपण संविधानाच्या गोष्टी करतो, लोकशाही म्हणतो. लोकशाही असेल तर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचे 80 टक्के अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेसोबत आले. लोकशाही आहे तर मग पक्ष चोरला किंवा सोडून गेला, चुकीचं वागला असं कसं काय बोलता येईल. जर लोकशाहीच्या गप्पा आपण मारतो, तर लोकशाही नक्की कशाला म्हणायचं? असा थेट सवाल सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार यांना विरोध करणाऱ्यांना अनेकांना विचारला आहे.