घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : विकासाच्या मुद्द्यांमुळे लोकांनी मला स्वीकारलं; परदेशातून माझ्या मतदारसंघात...

Lok Sabha 2024 : विकासाच्या मुद्द्यांमुळे लोकांनी मला स्वीकारलं; परदेशातून माझ्या मतदारसंघात मतदान – महादेव जानकर

Subscribe

मी विकासाच्या मुद्द्यांवरच प्रचार केला. विकासाच्या मुद्दे सोडून कधीच प्रचार केला नाही. त्यामुळेच लोकांनी मला स्वीकारलं. सर्वसामान्य माणसांपासून ते उच्च शिक्षित लोकांनी माझा स्वीकार केला, असे महादेव जानकर म्हणाले.

परभणी : मी विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार केल्यामुळे लोकांनी मला स्वीकारलं. विकासाच्या मुद्दे सोडून कधीच प्रचार केला नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसांपासून ते उच्च शिक्षित लोकांनी माझा स्वीकार केला. विशेष म्हणजे जपान, जर्मनी, विएतनाम, इंग्लंड येथून नागरिक माझ्या मतदारसंघात आले आणि मतदान केल्याचे महादेव जानकर म्हणाले. मतदान करण्यापूर्वी रासप नेते महादेव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महादेव जानकर यांनी परभणी मतदारसंघातील स्थितीवर भाष्य केले. (lok sabha election 2024 Mahadev Jankar Talks On second phase voting updates in marathi)

नेमकं काय म्हणाले महादेव जानकर?

“मी लोकसभेच्या रिंगणात उतरलो तेव्हा हलक्यात घेतलं. मात्र त्यानंतर जनतेनेच लोकसभा निवडणूक 2024 हाती घेतली, मला काहीच द्यावे लागले नाही. ज्यांनी-ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांना जनताच उत्तर देईल. परभणी लोकसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. अगदी परदेशातून माझ्या मतदारसंघात मतदान आले आहे. मला सकाळी 6:15 वाजता फोन आला आणि त्यांनी सांगितले की इंग्लंडवरून आम्ही दोघं पती-पत्नी मतदानासाठी आलो आहोत. जपान, जर्मनी, विएतनाम येथून नागरिक आले आणि त्यांनी मतदान केले”, असे रासपचे उमेदवार महादेव जानकर म्हणाले.

- Advertisement -

“मी विकासाच्या मुद्द्यांवरच प्रचार केला. विकासाच्या मुद्दे सोडून कधीच प्रचार केला नाही. त्यामुळेच लोकांनी मला स्वीकारलं. सर्वसामान्य माणसांपासून ते उच्च शिक्षित लोकांनी माझा स्वीकार केला”, असेही महादेव जानकर म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा देशाच्या राज्यगादीवर बसवण्यासाठी विक्रमी मतदान करा – संतोष बांगर

- Advertisement -

“मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणार आहे. त्यानुसार, सिंचन हब, एमआयडीसी, मेडिकल हब, Education हब आणि रेल्वे ट्रॅकबाबत मी भूमिका घेणार आहे. माझ्या प्रचाराकरीता सर्वांनीच मेहनत घेतली. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वसामान्य जनता यांचे आभार मानीन. या सगळ्यांच्या मेहनीतीमुळे लोकसभेला वेगळा रंग आला”, असेही महादेव जानकर म्हणाले.

“परभणी ही संत जनाबाई यांची भूमी असल्यामुळे लोकं फार शात आहेत. मला लोकांनी जेवण दिलं. माझ्याकडे गाडी पण मागितली नाही. मला काहीच न विचारता माझा प्रचार केला. माझ्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मन लावून परभणीत काम केले”, असेही जानकर यावेळी म्हणाले.

दरम्यान, रासप नेते महादेव जानकर यांना प्रचारावेळी गाडी अडवल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना महादेव जानकर म्हणाले की, “हो आमच्या गाड्या अडवल्या. मी कधीच बहाना करत नाही. मी देशभर फिरतो. बारामती, सांगलीतून निवडणूक लढवली. पण लोकसभाहीच्या दृष्टीकोनातून त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवायला नको होत्या. पण त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवत त्यांना धमकावलं. पण मी काहीच बोललो नाही. जनता ठरवले काय करायचं ते, मी बुद्धिबळ तो जग श्रेष्ठ आणि बाहुबली तो योद्धा श्रेष्ठ”, असे जानकर म्हणाले.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : मतदानानंतर प्रकाश आंबेडकरांची इथेनॉलवरून विरोधकांवर टीका; म्हणाले, हा VBA चा विजय

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -