घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : सांगलीचा वाद मिटला? चंद्रहार पाटलांसाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र...

Lok Sabha Election 2024 : सांगलीचा वाद मिटला? चंद्रहार पाटलांसाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार

Subscribe

शिवसेना ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यापासून काँग्रेस आणि शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू होते. मात्र आज (19 मार्च) तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत हे चंद्रहार पाटलांचा अर्ज दाखल करण्यासाठी सांगलीत गेले होते. त्यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी संजय राऊतांची भेट घेतली.

सांगली : शिवसेना ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यापासून काँग्रेस आणि शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू होते. मात्र आज (19 मार्च) तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत हे चंद्रहार पाटलांचा अर्ज दाखल करण्यासाठी सांगलीत गेले होते. त्यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी संजय राऊतांची भेट घेतली. तसेच, चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमदार विक्रम सावंत उपस्थित राहणार निश्चित झाले. यावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेले नाराजी नाट्य दूर झालं का? अशा चर्चांना उधाण आले आहे. (Lok Sabha Election 2024 sangli constitution sanjay raut talk on vishvajeet kadam and vishal patil)

शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या नाराजी नाट्याबाबत आणि आमदार विक्रम सावंत यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ‘महाविकास आघाडी महाराष्ट्रात आणि सांगलीत अत्यंत मजबूतीने पुढे जात आहे. सांगलीची जागा 100 टक्के महाविकास आघाडीच जिंकणार आहे’, असे वक्तव्य केले. दरम्यान, चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संजय राऊत, जयंत पाटील, विक्रम सावंत, अरुण लाड यांच्यासह मविआचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

विश्वजीत कदम नाराज असल्याबाबतही संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “विश्वजीत कदम काही व्यक्तीगत कारणांसाठी बाहेर आहेत. एक-दोन दिवसांत विश्वजीत कदम कामाला लागतील. सध्यस्थितीत सांगलीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत, त्या अर्थी सांगलीत काँग्रेस काम करते आहे. याबाबत शंका असण्याचे कारण नाही. आम्ही एकत्र आहोत म्हणून महाविकास झाली. महाराष्ट्रातील 48 जागांवर तिन्ही पक्षांनी जागावाटप केली. त्या जागांवर आता प्रत्येक पक्ष आपलं काम करत आहे. त्यामध्ये सांगली असून उरलेल्या 47 जागा ही आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

विशाल पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावरही संजय राऊत यांनी वक्तव्य केले. “विशाल पाटील यांची आम्ही समजूत काढू. विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातील आहेत. त्यांनी केवळ अर्ज भरला आहे. पण अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असे होत नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे भरले गेले आहेत. त्यामुळे उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही त्यांची समजूत काढू आणि अर्ज मागे घेण्यास सांगू. कधीकधी नाराज होतात त्यांचीही निवडणूक लढवण्याची इच्छा होती”, असे म्हणत संजय राऊत यांनी सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : …म्हणून विचारपूर्वक मतदान करा, आदित्य ठाकरेंचे मतदारांना आवाहन

तसेच, ‘यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात चमत्कार घडेल. नागपूरसह वर्धा अमरावती चंद्रपूर भंडारा-गोंदिया गडचिरोली या जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे’, असेही संजय राऊत म्हणाले,

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत झालेल्या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला गेला. त्यानंतर चंद्रहार पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. मात्र, चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरून सांगलीतील काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी दिल्लीला पक्षश्रष्ठींच्या भेटीला गेले होते. परंतू, त्यानंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत सांगली मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे घोषित करण्यात आले. तेव्हापासून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगले होते. अशात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगलीत दाखल झाले होते. त्यावेळी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.


हेही वाचा – LOK SABHA ELECTION 2024 : शरद पवारांची चाणक्यनिती, अनिकेत देशमुखांची माढ्यातून माघार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -