घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रLok Sabha Election 2024 : गरमी झाल्यावर राहुल गांधी थेट विदेशात जातात;...

Lok Sabha Election 2024 : गरमी झाल्यावर राहुल गांधी थेट विदेशात जातात; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Subscribe

लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघातील महायुतीतील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.

अहमदनगर : गरमी झाल्यावर राहुल गांधी थेट विदेशात जातात. पंतप्रधानांच्या नखाचीही इंडिया आघाडीला सर नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला असला तरी, राहुल गांधी कधीच या देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाही. या देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे, अशीही टीका एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. (Lok Sabha Election 2024 CM Eknath Shinde Slams Congress Leader Rahul Gandhi)

लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघातील महायुतीतील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरेंटीवर लोकांचा विश्वास आहे. सगळ्या गॅरेंटी फेल गेल्या. केवळ एकच पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरेंटी चालली. त्यामुळे पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्याची गॅरेंटी आपण देशवासियांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नखाचीही इंडिया आघाडीला सर येणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अजून लॉन्चिंग झालेले नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चांद्रयानचे यशस्वी लॉन्चिंग केले. पण राहुल गांधी यांचे गेल्या 50 वर्षांत लॉन्चिंग होऊ शकले नाही”, अशी टीका एकनाथ शिदेंनी राहुल गांधींवर केली.

- Advertisement -

हेही वाचा – LOK SABHA 2024 : यंदाच्या लोकसभेत शिवसेना किती जागा लढवणार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले उत्तर; वाचा सविस्तर

त्याशिवाय, “राहुल गांधी यांना गरमी झाली का, ते थेट विदेशात जातात. त्यामुळे तुम्हाला उन्हातान्हात काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे की, गरमी झाल्यावर विदेशात जाणारे राहुल गांधी पाहिजे? हे तुम्हीच ठरवा. त्यामुळे स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला असला तरी, राहुल गांधी कधीच या देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाही. या देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे. कारण त्यांनी त्यांचे सर्व आयुष्य देशकामासाठी समर्पित केले आहे. देशाला उंचावर नेऊन ठेवले आहे”, असा हल्लाबोलही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी राहुल गांधींवर केला.

- Advertisement -

विरोधकांच्या लंकेचे दहन करायचे आहे – एकनाथ शिंदे

अहमदनगरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला. “सुजय विखे पाटलांच्या नावातच जय आहे, त्यामुळे त्यांचा पराजय होणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांचे लीड वाढवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तसेच, विरोधकांच्या लंकेचे दहन करायचे आहे. महाविकास आघाडी रावण रूपी लंकेचे दहन करायचे आहे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी निलेश लंकेंवर केली.

दरम्यान, “अहमदनगरमध्ये एवढं कडक ऊन असून तुम्ही सुजय विखे पाटील यांच्या पाठिशी उभे राहिले आहात. म्हणजे सुजय विखे पाटलांचा विजय पक्का आहे. सुजय विखे हे एक तरुण युवा नेता म्हणून याठिकाणी काम करत आहेत. लोकसभेत ही सुजय विखेंनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. विठ्ठलराव विखे पाटील यांनी देशात सहकाराचा बीज रोवलं. त्यानंतर दिवंगत बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचे वटवृक्ष केला. त्यानंतर ही परंपरा आणि वारसा सुजय विखे पाटील पुढे चालवत आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घडामोडींमध्ये सुजय विखे पाटलांचा सहभाग असतो. प्रत्येकाच्या सुख-दु:खात जाण्याचे काम सुजय विखे पाटील करत आहेत”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : ठाकरे गटाचे भास्कर जाधव गेले कुठे? गीतेंच्या प्रचाराला गैरहजेरी

Edited By – Vaibhav Patil 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -