घरमहाराष्ट्रप्रवासी वाचले, पण आंबेनळीदुर्घटनेसारखी चालकावर शंका

प्रवासी वाचले, पण आंबेनळीदुर्घटनेसारखी चालकावर शंका

Subscribe

अक्कलकोट-महाड नियमित जाणार्‍या एसटी बसची आंबेनळी घाटासारखी दुर्घटना टळली असली तरी त्या दुर्घटनेच्या वेळी चालकाव्यतिरिक्त दुसरी व्यक्ती गाडी चालवत होती, तशीच शंका अक्कटकोट-महाड या बसबाबत व्यक्त करण्यात येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या महाड विभागाच्या अधिकार्‍यांनी याबाबत मौन धारण केले आहे. त्यामुळे या दुर्घटनेेचे गूढ वाढत आहे. त्यामुळे मुख्य चालकासह वाहकावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

दुर्घटनेनंतर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांचा मदतीने जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. यावेळी समोरून येणार्‍या गाडीने हुल दिल्याने गाडी खाली दरीत गेली अशी माहिती चालकाने दिली. बसमध्ये 56 प्रवासी तसेच चालक आणि वाहक असे एकूण 58 जण असल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी 27 प्रवासी जखमी असून त्यांच्यावर पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यापैकी 7 जणांना पुढील उपचारासाठी महाड येथे रवाना करण्यात आले.

- Advertisement -

पोलादपूर वाई सुरुर राज्य मार्गावर पोलादपूर तालुक्यातील पायटा गावाजवळ घाट उतरत असताना बसला झालेल्या अपघाताच्या वेळी मुख्य चालक प्रवीण खरात बस चालवीत नव्हते, तर त्यांच्यासमवेत असलेले संदीप तावरे हे बस चालवीत होते, असा आरोप प्रवासी वर्गाने केला आहे. अक्कलकोट-महाड बसला 30 ऑक्टोबरला बुधवारी रात्री 7.45 च्या सुमारास झालेल्या अपघातात 27 प्रवासी जखमी झाले होते. या अपघातानंतर 28 जुलै 2018 च्या दाभिल टोक येथे कृषी विद्यापीठ दापोलीच्या बसच्या आठवणी ताज्या झाल्या.

या अपघातात चालकाविषयी गूढ कायम राहिला आहे. मात्र बुधवारी झालेल्या एसटीच्या अपघातातील चालकाच्या कृतीविषयी काही तास संपले. तरीही अधिकारी वर्ग मुख्य चालकासह बस चालविणार्‍यावर का कारवाई करत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -