घरमहाराष्ट्रMaharashra APMC Election: कोणाची सरशी, कोणाचा उठला 'बाजार'? महाराष्ट्रात कोणती APMC कोणाच्या...

Maharashra APMC Election: कोणाची सरशी, कोणाचा उठला ‘बाजार’? महाराष्ट्रात कोणती APMC कोणाच्या हाती? जाणून घ्या सविस्तर

Subscribe

अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत आहे. मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे हे आज स्पष्ट होणार आहे. तर 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे. 

ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान झालं. त्यापैकी 95 बाजार समित्यांची आज प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत आहे. मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे हे आज स्पष्ट होणार आहे. तर 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे.  ( APMC Election 2023 Result Maharashtra APMC Election 2023 Agriculture produce market Committee election lates update  )

नाशिकच्या देवळा बाजार समितीवर भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता

देवळा बाजार समितीवर भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर आणि राष्ट्रवादीचे योगेश आहेत यांच्या नेतृत्त्वाखील शेतकरी विकास प‌ॅनलची सरशी झाली. शेतकरी विकास प‌‌ॅनलला सोसायटी आणि ग्रामपंचायत गटाच्या सर्व जागांवर विजय मिळाला आहे. यापूर्वी 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर 10 पैकी 7 जागांवर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

- Advertisement -

अमरावती जिल्ह्यात यशोमती ठाकूर यांना मोठं यश

अमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते यशोमती ठाकून यांनी चांगला विजय मिळवला आहे. या बाजार समितीत यशोमती ठाकूर यांच्या गटाला तब्बल 18 जागांवर यश मिळालं आहे. तर भाजप,राष्ट्रवादी आणि प्रहारचा धुव्वा उडाला आहे. निकाल समोर आल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आला.

मोर्शी बाजार समितीत भाजप खासदार अनिल बोंडेंना धक्का

अमरावतीमध्ये मोर्शी बाजार समितीत भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना धक्का बसला आहे. मोर्शी बाजार समितीत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी तर भाजर, काँग्रेसचे 8 उमेदवार विजयी झाले आहेत. हा अनिल बोंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस

भाजपचे आमदार रमेश कराड यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं आव्हान दिलं होतं. मात्र, भाजपमधील गटा-तटाचं राजकारण चांगलचं तापलं होतं. त्याचाच फटका भाजपला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बसला आहे. 18 जागा एक हाती स्वत:कडे खेचत काँग्रेसने मोठा विजय मिळवला.

( हेही वाचा :बारसूत आंदोलनाचा भडका )

पालघर समितीवर महाविकास आघाडीची सरशी

पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा 17 पैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीने पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त केले. आधीच झालेल्या छाननीमध्ये पंधरा जागा बिनविरोध झाल्या होत्या तर आज झालेल्या व्यापारी अडते निवडणुकीत महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आणि शिवसेनेला एक ही जागा मिळवता आली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -