घरमहाराष्ट्रही कर्नाटक, गुजरात, तेलंगणाची कामं नाहीत; विकासकामांच्या स्थगितीवरून अजित पवार संतापले

ही कर्नाटक, गुजरात, तेलंगणाची कामं नाहीत; विकासकामांच्या स्थगितीवरून अजित पवार संतापले

Subscribe

नागपूरमध्ये कालपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा कालचा दिवस कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरुन गाजला. तर आज विकास कामांच्या स्थगितीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विकास कामांच्या स्थगितीवरून शिंदे फडणवीस सरकारवर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशन सुरू होताच अजित पवार यांनी शिंदे सरकारने स्थगित केलेल्या कामांवरून सरकारवर टीका केली. मी देखील सात वेळेस निवडून आलो आहे. मनोहर जोशींचे सरकार बघितलं, नारायण राणेंचं सरकार बघितलं वेगवेगळी सरकारं बघितली. देवेंद्र फडणवीसांचेही सरकार पाच वर्षे बघितलं, पण मंजुर झालेली विकास काम कधी थांबली नव्हती. महाराष्ट्रातील ही काम आहेत, कर्नाटक, गुजरात, तेलंगणाची काम नाहीत, म्हणत अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी विरोधकांनी  गोंधळ घालत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली.

राणे, जोशी, फडणवीसांचे सरकार पाहिले पण विकास काम थांबली नाहीत

अजित पवार म्हणाले की, सभागृहात आम्ही सर्वांची काम होण्यासाठी येतो. सहा महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली फडणवीसांचे सरकार आले. यापूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात अर्थसंकल्पात मंजुर झालेली व्हाईट बुकमध्ये मंजूर झालेली कामांना वरच्या आणि खालच्या सभागृहाने मान्यता दिली होती, मंजूर झाली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि इतर सर्व मित्र पक्षांची कामं थांबवली, यावेळी लोकशाही मार्गाने विरोधी पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांनी भेटलो अनेक जण भेटले. अर्थ खातं असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, सरकार सत्तेवर येत असतं जात असतं.

- Advertisement -

अध्यक्ष तुमची पहिला टर्म आहे पण आमच्या सात सात टर्म झाल्या. मनोहर जोशींचे सरकार बघितले, नारायण राणेंचं सरकार बघितलं वेगवेगळी सरकारं बघितली. देवेंद्र फडणलीसांचेही सरकार पाच वर्षे बघितलं, पण मंजुर झालेली काम कधी थांबली नव्हती. महाराष्ट्रातील ही काम आहेत, कर्नाटक, गुजरात, तेलंगणाची काम नाहीत.


उमेश कोल्हेची हत्या तब्लिगी जमातकडूनच, एनआयएकडून कोर्टात आरोपपत्र सादर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -