घरफोटोगॅलरी५० आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले बोके... सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका

५० आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले बोके… सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका

Subscribe

दोन वर्षांनंतर नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला रंगत आली आहे. पहिल्या दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभं राहत सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली होती. आजच्या विधिमंडळ कामकाजाच्या सुरुवातीलाही विरोधकांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला. आज सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांविरोधात तुफान घोषणाबाजी आणि बॅनरबाजी केली. खोके, बोके आणि ओकेच्या घोषात विधान भवन परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषात विरोधकांनी पावसाळी अधिवेशनही दणाणून सोडले होते. आता हिवाळी अधिवेशनातही विरोधकांनी पायऱ्यांवर उभं राहत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांसमोर नरमेल तो सत्ताधारी कसला. त्यांनीही युक्ती लढवत विरोधकांवर शाब्दिक बाण सोडले आहेत. पन्नास खोके एकदम ओकेला प्रत्युत्तर म्हणून ५० आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले बोके असा घोष सुरू केला आहे.

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -