घरताज्या घडामोडीMaharshtra Budget 2021:घरकाम करणाऱ्या महिलांसाठी 'संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना'

Maharshtra Budget 2021:घरकाम करणाऱ्या महिलांसाठी ‘संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना’

Subscribe

राज्याचे अर्थसंकल्पीय बजेट राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षा आणि कल्याणसाठी अनेक घोषणा आणि तरतुदी करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात सर्वाधिक फटका बसलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी योजनेची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी घरकाम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेविषयी माहिती देताना म्हणाले की, कोरोना काळात ताळेबंदीचा सर्वांनाच फटका सर्वांनाच बसला असला तरी यावेळी सर्वाधिक कुचंबना झाली ती असंघटीत क्षेत्रातील कष्टकऱ्यांची. त्यातही घरकाम करणाऱ्या माय भगिनींची अवस्था आणखी बिकट होती. या माय भगिनी यापुढे अशा संकाटात मदतीपासून वंचित राहू नये यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी आणि व त्यांना आधार ठरले अशी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना जाहीर करत आहेत. अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

तसेच या महिलांच्या सामाजिक सुरक्षा आणि कल्याणासाठी समर्पित कल्याण निधी निर्माण करण्याचे प्रस्तावित आहेत. यासाठी बिज भांडवल म्हणून आज महिलादिनानिमित्त सरकारच्यावतीने २५० कोटींचा निधी जाहीर करण्यात आले आहे. जमा होणाऱ्या एकूण निधीतून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी कल्याण कारी योजना राबवण्यात येतील. असेही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा- Maharashtra Budget 2021: अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -