घरBudget 2024Maharashtra Budget Session : "मर्दासारखे बोला...", विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात

Maharashtra Budget Session : “मर्दासारखे बोला…”, विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात

Subscribe

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेत त्यांना उत्तर दिले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 293 अंतर्गत प्रस्ताव मांडत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. खोटे बोला, पण रेटून बोला, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Maharashtra Budget Session: CM Eknath Shinde criticized the opposition in the Legislative Assembly)

हेही वाचा… Maharashtra Budget Session : “तुम्ही केवळ घोषणा, आम्ही भरीव मदत केली”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

- Advertisement -

विधानसभेत बोलताना भाषणाच्या सुरुवातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधकांची एकच स्क्रिफ्ट आणि एकच ड्राफ्ट असतो. एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना? त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चालले आहेत. नाना पटोले तुम्ही प्रामाणिकपणे कबुल करा, तुम्ही खासगीमध्ये जेव्हा भेटता तेव्हा कबूल करता की, चांगले निर्णय घेतले आहेत. जे आहे ते घेतले आहेत. पैसे दिले आहेत. तुम्हाला कुठेही बोट दायखवायला जागा आम्ही सरकार देत नाहीत. तुम्ही मुद्द्यावर टीका केली पाहिजे. सरकार चुकत असेल तर टीका केली पाहिजे. पण काही बोलायचे नसेल तर मुद्द्यावर बोलायचे नाही. अपशब्द वापरायचे, आरोप करायचे, मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचे हे सगळं बाहेर आणि आत चालू असते”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

पक्ष चोरला, चिन्ह चोरले म्हणून, रोजच थयथयाट सुरू आहे, अशी नवीन राजकीय संस्कृती जी निर्माण झाली आहे ते बरोबर नाही. स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशाप्रकारचा कांगावा करणे हे हास्यास्पद आहे. विचार विकले, भूमिका विकली, आयडोलॉजी विकली, सत्तेसाठी सर्व केले, पण मग सरकार चांगले काम करते तर टीका करतात. नाना पटोले तुम्ही वैयक्तिक घेऊ नका. सारखे चोरले म्हणून बोलायचे ही कोणती भूमिका आहे? अरे मर्दासारखे बोला. जाहीरपणे बोला. जे आम्ही देत आहोत, ते जाहीरपणे देत आहोत, असा टोलाच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

- Advertisement -

याचवेळी त्यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला. आम्हाला खोके खोके म्हणणारे, त्यांनी आमच्याच खात्यातून 50 कोटी घेतले आहेत. त्याची आता चौकशी सुरू आहे. शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी घेतले. शिवसेना अधिकृतपणे आमच्याकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. खोके पुरत नाही म्हणून… मी नाही म्हणत, कुणीतरी म्हटले आहे, असा आरोप करत त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. तर, विरोधी पक्षनेते कुठे आहेत? मी त्यांचे भाषण सुरू आहे म्हणून आलो. मी त्यांचे ऐकून घेतले. पण आता माझी बोलण्याची वेळ आली तर ते निघून गेले. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन चाकं आहेत. ते येत आहेत तर ठीक आहे. विरोधकांचा बाराही महिने राजकीय धुळवड करण्याचा प्रयत्न हा अतिशय केविलपणाचा आहे, अशी जहरी टीका मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -